आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवनेश्वरच्या दर्शनासाठी मोफत बससेवा, सायन्सकोर, विलासनगर, नवाथे प्‍लॉट येथून सुटणार बसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाशिवरात्रीच्या पर्वावर तपोवनेश्वरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद उत्सव समिती, संपर्क विभाग आणि सामाजिक समरसता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बससेवा दिली जाणार आहे.
मोफत बससेवा देण्याचे विश्व हिंदू परिषदेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. विलासनगर, नवाथे प्लॉट सायन्सस्कोर मैदान येथून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या बसेस सुरू राहणार आहेत.अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर असलेले तपोवनेश्वर या मंिदरची प्राचीन जागृत देवस्थान अशी सर्वदूर ओळख आहे. रुक्मिणी यांची आई नियमित या मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी येत होत्या. याशिवाय राजा दशरथ यांनी स्वत: येथील भूमीत त्यांचे पुत्र कामेष्ठी यांच्याकरिता यज्ञ करण्यासाठी श्रुंगी ऋषी यांना विनंती केली होती, असे तपोवनेश्वर येथील मंदिरातील फलकांवर दर्शवण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील भाविकांना तपोवनेश्वर येथील प्राचीन मंदिराचे महत्त्व कळावे तथा त्यांना दर्शनाचा लाभ घेता यावा, या उद्देशाने िवहिंपतर्फे मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीला मंगळवारी (दि. १७) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विलासनगर, नवाथे प्लॉट सायन्स स्कोर मैदान येथून मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष महेश पिंजानी, अशोक ट्रॅव्हल्सचे चंद्रकांत बुंदेले, हनुमानगीर ट्रॅव्हल्सचे इटनकर, सुगमचंद गुप्ता, श्रेयस मोटारचे भांडारकर यांचे सहकार्य लाभणार आहे. या सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीतर्फे चंद्रकात दामाणी, डॉ. चिकटे, अनिल साहू, गणेश किल्लेकर, राजेश मिश्रा, विशाल कुळकर्णी, प्रवीण गिरी आदी पदािधका-यांनी केले आहे.
भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आले आयोजन-
विश्वहिंदू परिषद यंदा ५० वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. संत-महंतांद्वारा हिंदू धर्माचा प्रचार आणि मानवसेवेच्या हेतूने िवहिंपतर्फे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोिजत केले जाणार आहेत. महािशवरात्रीला शहरातील भाविकांना तपोवनेश्वर येथील प्राचीन मंदिराचे महत्त्व कळावे त्यांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी मोफत बससेवेचे आयोजन केले आहे. तपोवनेश्वरांच्या दर्शनाची इच्छा असूनही, गोरगरिब भाविकांना आर्थिक परिस्थितीमुळे वंचित राहावे लागते. परंतु, आता या सेवेमुळे त्यांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विजयशर्मा, आयोजक.