आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fresh And Healthy Food For Prisoners In Vidarbha

कैद्यांना मिळणार गरम आणि ताजे अन्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेत कारागृह प्रशासनाने मागील काही दिवसांत अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत विदर्भातील केंद्रीय आणि जिल्हा कारागृहातील कैद्यांना गरम व ताजे अन्न पुरवण्याकरिता संत गजानन महाराज देवस्थान, शेगावच्या धर्तीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

विदर्भात नागपूर आणि अमरावती येथे केंद्रीय आणि वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अकोला व बुलडाणा येथे जिल्हा कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये आठ हजारांवर कैदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहातील अन्नाची गुणवत्ता आणि दर्जा हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. अन्नाच्या निकृष्टतेविषयी आरोपही होतात. हा आरोप पुसून काढण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) पूर्व विभाग कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

कारागृहांमध्ये सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता कैद्यांना भोजन देण्यात येते. कारागृहातील कैद्यांना त्यांच्या बॅरेकमध्येच डब्यातून जेवण दिले जाते. संध्याकाळी 5 वाजता अन्न तयार झाल्यानंतर प्रशासनातर्फे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक कैद्याला डबा पोहोचवण्यात येतो. सकाळच्या जेवणाची वेळ बरोबर असून, संध्याकाळी 5 वाजता कोणताही कैदी जेवण करत नाही. काही अपवाद वगळले तर प्रत्येक जण रात्री 8 ते 8.30 वाजेनंतर जेवण करतो. त्यामुळे डब्यातील चपाती कडक होते आणि इतर अन्नाला चव उरत नाही. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत कारागृह प्रशासनाने डब्यातील अन्न गरम ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.