आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून पाच महिने ‘लग्नोबा’ झाले ‘थंडोबा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बुधवारपासून सुरू होणारा अधिकमास आणि त्यानंतरचा चातुर्मास या कालावधीत विवाहाच्या तारखा नसल्याने तुलसी विवाहापासून सुरू झालेल्या लग्नाच्या धामधूमीला आता ब्रेक लागलाय. त्यामुळे पुढील पाच महिने लग्नांची धामधूम थांबणार आहे. सनई, चाैघड्यांसह अाॅर्केस्ट्रा, डीजे, मिरवणुकीतील ढाेलचे अावाज अाता बंद होणार आहेत.
अाता पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर म्हणजे २४ नाेव्हेंबरपासून लग्नांचा धडाका पुन्हा सुरू हाेईल. यावर्षी तुलसी विवाहानंतर २४ नोव्हेंबरलाच लग्नाचा मुहूर्त असल्याचे पौरोहित सारंग जोशी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

१२ जून ही शेवटची लग्नतिथी हाेती. गेल्या वर्षात अनेक विवाह पार पडलीत. अनेकांनी अायुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हातही अनेकांनी लग्नांचा अानंद घेतला. विदर्भात पंचांगानुसार तिथी पाहिली जाते. त्यामुळे पुराेहितांना विचारून अापल्याला लाभणारे मुहूर्त पाहता येणार आहे.

व्रतवैकल्यांचा महिना म्हणजे अधिक मास या अधिक मासाची सुरुवात १७ जूनपासून होत आहे. त्यातच सुवासिनीने करावयाचे असलेल्या कोकिळा व्रताचा योग तब्बल १८ वर्षांनंतर आला आहे. ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा झाल्यानंतर विविध सण व्रत वैकल्य सुरू होतात. त्यातच यंदा अधिक आषाढमास असल्याने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल या काळात वाढते.

चतुर्मासामुळे तिथी नाही
यंदाअधिक मासही येत अाहे. त्याचप्रमाणे अाषाढी एकादशीपासून चतुर्मासास सुरुवात हाेते. कार्तिक एकादशीला हा मास समाप्त हाेताे. त्यामुळे दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहपाठोपाठ लग्न कार्यास सुरुवात होईल. चार महिन्यांनंतरची २४ नाेव्हेंबर २०१५ ही लग्नाच्या मुहूर्ताची पहिली तारीख अाहे. सारंगजोशी, पुरोहित, अमरावती.
बुधवारपासून अधिकमास सुरुवात