आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाने करपलेल्या स्वप्नांना नव्या उमेदीची पालवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुलालासाधं खरचटलं वा भाजलं तरी आई-वडील अस्वस्थ होतात...लगेच स्पेशालिस्टकडे धाव घेतात...इथे तर वयाच्या पाचव्या वर्षीच जोगींदरसिंहच्या डोळ्यादेखत दहशतवाद्यांनी त्याच्या घरातील सर्वच्या सर्व १५ जणांना अतिशय क्रूरपणे मारलेले...आशिक खानचे वडील जमाते इस्लामी या दहशतवादी संघटनेचे सदस्य. लष्कराच्या चकमकीत ते ठार झाले, तर लहानगा आशिक वडिलांचा बदला घ्यायला निघालेला...जाहीद भट्ट, रुबीना अब्दुल मीर, स्टॅनजिन दोरजे, रिग्जिन छंडोल या सर्वांची कहाणी थोड्याफार फरकाने सारखीच...दहशतवादाने करपलेल्या स्वप्नांना नव्या उमेदीची पालवी िदली ती सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी...

१९८० च्या दशकात संजय नहार यांच्या सरहद संस्थेने पंजाबपासून आपल्या कामाला सुरुवात केली. दहशतवादाला बळी पडून उद््ध्वस्त झालेल्या कुटुंबातील तसेच दहशतवादग्रस्त पंजाब, जम्मू-काश्मीर, नाॅर्थ-ईस्ट या प्रदेशातील गरिबी रेखेखालील मुलांना मायेचा आधार दिला जातो. या मुलांचे संगाेपन आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरहदतर्फे घेतली जाते. पुण्यात दहावीपर्यंत शिक्षण देणारे सरहद स्कूल आणि त्यानंतर किमान ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. त्यानंतरचे शिक्षण घ्यायचे असेल, तर सरहदतर्फे मदत केली जाते, असे संचालक प्रशांत तळणीकर यांनी िदली. सरहदचे सहा िवद्यार्थी नागपुरात आले असता माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. दहशतवादपीडित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरहदचे हे सहा शांतिदूत ‘जागो भारत, एका भारताची संकल्पना’ या अभियानांतर्गत संपूर्ण देशभर फिरून कोटी िवद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातून झाली. रिंगजेन छंडोलचे वडील कारगील युद्धत शहीद झाले. तीन भाऊ आणि दोन बहिणी असे हे कुटुंब. तिचा एक भाऊ लष्करात आहे. वडील शहीद झाले तेव्हा रिग्जिन फक्त चार वर्षांची होती. आईने तिला सरहदमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. आज ती ११ वी काॅमर्सला शिकत आहे. तिला बँकर्स व्हायचे आहे. आशिक खानचे वडील जमाते इस्लामीचे दहशतवादी होते. लष्कराशी झालेल्या चकमकीत ते मारल्या गेले. भावाने त्याला सरहदमध्ये आणले. आज तो हिंदुस्थानचा आशिक झाला.लद्दाखमध्ये रिंगजेनचा अर्थ होतो गुलाब. तिचे आयुष्यही गुलाबासारखे फुलावेस अशा सदिच्छा सर्वांनी दिल्या.
जम्मू-काश्मिरात सरहद संस्थेचे काम सुरू करणार-
वेगवेगळ्याफुलांचा एक छान गुलदस्ता म्हणजे हे सहा जण. सरहदमध्ये आजच्या घडीला सुमारे दीडशे ते दोनशे मुले-मुली शिकत आहेत. प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. ही मुले जम्मू-काश्मिरात सरहदसारखीच संस्था सुरू करणार आहे. आपल्या वाटल्या आले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी.
आता हिंदुस्थानचा झाला आशिक-
आशिकखानचे वडील जमाते इस्लामीचे दहशतवादी होते. लष्कराशी झालेल्या चकमकीत ते मारल्या गेले. आशिकच्या मनात वडीलांचा बदला घेण्याचे विचार सुरू झाले. परंतु आई भावाने त्याला सरहदमध्ये आणले. आज तो हिंदुस्थानचा आशिक झाला आहे. ‘आय लव्ह माय इंडिया’ हाच त्याचा मंत्र आहे...जम्मू काश्मिरात जाऊन तेथील भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे, असे आशिकने सांगितले.