आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fruad Investment Case News In Marathi, Shreesurya, Mukund Pitale, Divya Marathi

फसवणुक प्रकरण: गुन्हे शाखेने पितळेंच्या मालमत्तेची कागदपत्रे केली जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘श्रीसूर्या’चे बिझनेस असोसिएट मुकुंद व मोहन पितळे यांच्या विविध ठिकाणी असलेल्या चार कोटी 21 लाखांच्या मालमत्तेची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहेत. अमरावती शहरातील मुकुंद व मोहन पितळे हे दोघेही या प्रकरणात सहआरोपी आहेत.

‘श्रीसूर्या’चे मुख्य समीर व पल्लवी जोशी दाम्पत्याकडील तसेच ‘श्रीसूर्या’ची मालमत्ता यापूर्वीच जप्त केली. ‘श्रीसूर्या’मध्ये गुंतवणूक करणार्‍या शेकडो गुंतवणूकदारांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी अँड. मोहन मोरे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी समीर, पल्लवी जोशींसह मुकुंद अंबादास पितळे, मोहन मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुर्‍हेकर, आनंद जहागीरदार यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील मुकुंद पितळे, मोहन पितळे आणि नितीन केसकर या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना पाच मेपर्यंत पेालिस कोठडी मिळाली. तपासादरम्यान पोलिसांनी मुकुंद व मोहन पितळे या दोघांच्या नावे असलेल्या अमरावती, पुणे व इतर ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली तसेच दोन कारही जप्त केल्या आहेत.

चार कोटी 21 लाखांची माया
* अमरावती शहरातील अमर कॉलनीमधील सिल्व्हर प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 302 आणि 102, किंमत 70 लाख रुपये
* पुणे शहरातील जानकी रेनबो अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक 402, किंमत 60 लाख रुपये
* राजापेठ प्रगणे बडनेरा येथील 576 चौ.फूट जागा, किंमत 10 लाख रुपये
* मौजे शिरजगाव बंड प्रगणे रिद्धपूरमधील जागा, 8 लाख रुपये
* अकोला येथील सहा फ्लॅटचे बांधकाम असलेल्या जागेची कागदपत्रे, किंमत एक कोटी 80 लाख रुपये तसेच नोटा मोजण्याचे मशिन किंमत 20 हजार रुपये जप्त केली आहे.
* मोहन, मुकुंद पितळेंच्या या मालमत्तेची कागदपत्रे केली जप्त
* अमरावती शहरातील अमर कॉलनीमधील सिल्व्हर प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 301 किंमत 35 लाख रुपये
* बांगर बिल्डर, प्रा. लि. अकोला रमाई

अकोल्यातही गुन्हा दाखल
या प्रकरणी अकोला येथे गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनाही मुकुंद आणि मोहन पितळे हवे आहेत. या दोघांची मालकीच्या चार कोटींपेक्षा अधिक मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. दुय्यम निबंधकांना ही माहिती दिली. महेशकुमार ठाकूर, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा. अमरावती.

चार कोटी 21 लाखाची माया
* अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक बी -2 किंमत 25 लाख
* अकोला येथील रमाई अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक जी-2 मृदुल शरद जोशी, रा. ओम सोसायटी, गौरक्षण रोड, अमरावती यांना बक्षीसपत्र करून दिले आहे. कागदोपत्री किंमत 25 लाख
* एमएच 30 एए 4932 व एमएच 31 सीपी 1163 या क्रमांकाच्या कार जप्त केल्या. किं. 8 लाख.