आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव टिप्परने शिक्षक दाम्पत्याला चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव वाळूच्या टिप्परने जबर धडक देऊन चिरडल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आशियाड कॉलनी चौक ते कठाेरा नाक्या दरम्यान गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. सुभाष प्रल्हाद हुमने (४२) आणि सरोज उर्फ सरोजिनी सुभाष हुमने (३८, दोघेही रा. केवल कॉलनी, प्लॉट क्रमांक २, अमरावती) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. हुमने दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांची एकुलती एक मुलगी ऋतुजा मातृ - पितृछत्राला पोरकी झाली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताला मार्गावरील अतिक्रमण कारणीभूत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
सुभाष सरोज हुमने हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक हाेते. सुभाष हुमने हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथे तर फुबगावच्याच बाजूला असलेल्या सावंगा (गुरूव) येथील शाळेवर सरोजिनी या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी सकाळी सुभाष हुमने यांची एमएस-सीआयटीची शहरातच परीक्षा होती, त्यामुळे ते उशिराने शाळेत जाणार होते. त्यामुळे ते सरोज यांना बसने जाण्यासाठी शेगाव नाक्यापर्यंत सोडून देण्यासाठी दुचाकीने येत होते. मात्र, घरापासून काही अंतरावर आल्यानंतर आशियाड कॉलनी चौकापासून अवघ्या १०० मीटरवर मागून भरधाव आलेल्या वाळूच्या टिप्परने (एम. एच. ३६ एफ ९६३) हुमने यांच्या दुचाकीला (एम. एच. २७ एजी ५१११) जबर धडक दिली. या वेळी दुचाकी एका बाजूला जाऊन पडली आणि हुमने दाम्पत्य टिप्परच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली आले. महाकाय वजनाचा टिप्पर
मृतक सराेज हुमने
मृतक सुभाष हुमने
लवकरच अधिसूचना काढू
सध्याशहरात जड वाहनांना प्रवेशासंबंधीच्या अधिसूचनेत बदल होणार आहे. नवीन अधिसूचना ही सर्वसमावेशक राहील.तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी प्रस्तावित केलेल्या अधिसूचनेला अनेक वाहतूक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे सध्या जुनीच अधिसूचना लागू आहे. मात्र, लवकरच शहरातील मार्गाप्रमाणे विभागानुसार सर्वसमावेशक अधिसूचना काढण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारी सुरू झाली आहे. राजकुमारव्हटकर, पोलिस आयुक्त,अमरावती.
हुमने डाव्या बाजूला दुचाकी चालवत होते. त्यांच्या विरुद्ध दिशेने सायकलस्वार आल्याने त्याला वाचवण्यासाठी त्यांनी दुचाकी थोडी उजव्या बाजूकडे घेतली. परंतु,मागून वाळूच्या टिप्परने हुमने यांच्या दुचाकीला धक्का दिला.यात ते रस्त्यावर आदळले टिप्परचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सरोजिनी हुमने यांच्या ज्येष्ठ भगिनी यासुद्धा शिक्षिका आहेत. त्या सध्या फुबगाव येथेच कार्यरत आहेत. त्यामुळे हुमने दाम्पत्यासोबत त्यासुद्धा ये-जा करायच्या. या तिघांनाही एकाच भागात एकाच वेळी शाळेत जावे लागत असल्यामुळे सुभाष हुमने हे मारुती व्हॅनने जायचे. आज मात्र ते दुचाकीने जायला निघाले आणि अपघात झाला.

मागून काळ बनून आलेल्या वाळूच्या याच टिप्परने शिक्षक हुमने दाम्पत्याचा नाहक बळी घेतला. शेगाव नाका ते आशियाड काॅलनी रोडवर अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या वेळी पोलिसही तैनात होते. छाया:मनीष जगताप.