आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajanan Maharaj Festival Celebrate Issue At Amravati, Divya Marathi

भक्तांसंगे निघाली गजानन माउली..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विदर्भातील हजारो भाविकांचे आराध्यदैवत शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा 136 वा प्रकटदिन शनिवारी (दि. 22) शहरातील गजानन मंदिरांमध्ये मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘गण गण गणात बोते, श्री गजानन. जय गजानन.’ असा मंत्रघोष संपूर्ण अंबानगरीत गुंजत होता. गजाननांचे दश्रन घेण्यासाठी मंदिर परिसरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच अलोट गर्दी केली होती. मंदिरांत आयोजित विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक समारंभांचा महाप्रसादाने उत्साहात समारोप करण्यात आला. प्रकटदिनाचे औचित्य साधून अनेक परिसरांतून ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीने शहरात नवचैतन्य संचारले होते. दरम्यान, पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्यांची सुंदर आरास घातली होती.

साईनगरात अवतरली शेगावनगरी
‘गण गण गणात बोते’चा जयघोष करत मोठय़ा हर्षोल्हासात शनिवारी साईनगर येथील श्रीक्षेत्र गजाननधाम मंदिरात संत गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा करण्यात आला. ‘गण गण गणात बोते.,’ ‘शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज की जय.’अशा जयघोषाने अवघा साईनगर परिसर दुमदुमून गेला होता.

सर्मथ सद्गुरू संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त साईनगर परिसर मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाला. मंदिर परिसरात रेखाटण्यात आलेली गजाननांची सुरेख रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. दश्रनासाठी भक्तांची सुरू असलेली लगबग आणि श्रींच्या दश्रनासाठी लागलेल्या लांबच-लांब रांगा बघून गजानन महिमेची प्रचिती भक्तगण प्रत्यक्ष अनुभवत होते.

‘याचि देही, याचि डोळा,’ असा अभूतपूर्व सोहळा भक्तांनी शनिवारी अनुभवला. साईनगर परिसरात अवघी शेगावनगरी अवतरली होती. पहाटेपासूनच भाविकांनी ‘श्रीं’च्या दश्रनासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: फुलून गेला होता. पहाटे ‘श्रीं’चा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी दश्रनाचा लाभ घेतला. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. वेळ मिळेल तसा भक्तगण मंदिरात येऊन ‘श्रीं’चे दश्रन घेत होते. मंदिरात भक्तिमय वातावरणात भक्तगण संत गजानाचे आशीर्वाद घेत होते. दरम्यान, सप्ताहापासून सुरू असलेल्या महाभारत ग्रंथ कथा प्रवचनाचा शनिवारी समारोप करण्यात आला. काकड आरती, हरिपाठ, ‘श्रीं’ची पंचोपचार आरती, प्रवचन आणि भक्तिसंगीत इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील कानाकोपर्‍यांतून भाविकांनी या कार्यक्रमांत उत्साहाने सहभाग घेतला.