आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajanan Maharaj Temple Issue At Amravati, Divya Marathi

पाच वर्षांत झाली दीडशेवर मंदिरांमध्ये ‘श्रीं’ची स्थापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- संत श्री गजानन महाराज वैदर्भीयांचे आराध्य दैवत. महाराज देहरूपात नसले, तरी शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमधून त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरूच आहे. महाराजांच्या या भक्तिसागरातील अमृतथेंबांनी मागील पाच वर्षांत अमरावतीकर न्हाऊन निघाले आहेत.

थोड्याथोडक्या नव्हे, तर पाच वर्षांत अमरावतीत उभारलेल्या तब्बल दीडशेवर लहान-मोठय़ा मंदिरांमधून संत गजानन महाराजांच्या दश्रनाचा लाभ अमरावतीकरांना मिळत आहे. त्यासाठी ‘श्रीं’च्या भक्तसमुदायाने पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध वस्ती व कॉलनी यामध्ये नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन उभारलेल्या अशा मंदिरांची संख्या दीडशेच्या आसपास पोहोचली आहे. संत गजानन महाराजांपुढे लीन होऊन संस्कार, शिस्त, भक्ती, श्रद्धेची शिकवण लोकांच्या घराघरांत पोहोचत आहे.

दरवर्षी होते 1200 किलोचे अन्नदान
संत गजानन महाराजांचा प्रकटदिन, पुण्यतिथी, गुरुवार अशा वेगवेगळ्या निमित्ताने अमरावतीकर दरवर्षी समारे एक हजार 200 किलो अन्नदान करतात. घाऊक धान्य बाजारातून यासाठी बरेच व्यावसायिक मदत करतात, असे कीर्ती जाजू यांनी सांगितले. अन्नदानातून 32 हजारांवर गरजूंना अन्नछत्र उपलब्ध होते.

अमरावतीकर आहेत सर्वाधिक दानदाते
संत गजानन महाराजांच्या नावाने सुरू असणार्‍या विविध लोकहितकारी उपक्रमांमध्ये अमरावतीकर दरवर्षी सुमारे 95.84 लाख रुपये देणगी देतात. शेगाव येथील संस्थानला अमरावतीकर वर्षाकाठी सुमारे 68 लाखांवर देणगी देतात, ज्याच्या माध्यमातून संस्थान गरजूंना मदत पुरवते.