आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर परिसरात बाप्पांचा जल्लाेष, आसमंत निनादला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुलालाचीउधळण, टाळ-मृदंगाचा निनाद.. पावली करणारे वारकरी.. डीजेच्या तालावर थिरकणारी चिमुकली मंडळी, तरुण ढोल-ताशांचा गजर, अशा हर्षोल्लासात शुक्रवारी घरोघरी तसेच मुख्य मंडळांसह छोट्या-मोठ्या मंडळांमध्ये बाप्पांचे जाेरदार स्वागत करत प्रतिष्ठापना करण्यात आली. गुलालामुळे बाप्पांच्या जयघाेषाने अासमंत निनादून गेला हाेता.
‘एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार..’,‘अाला रे अाला गणपती अाला...’,‘गणपती बाप्पा माेरया.. मंगलमूर्ती माेरया,’ या अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. दरम्यान, गणेश मूर्तींची स्थापना करण्यासाठी भक्तांची सकाळपासूनच माेठ्या प्रमाणावर गर्दी दिसून अाली. अाबालवृद्धांसह चिमुकल्यांच्या उत्साहालाही उधाण आले होते. अधून- मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरींच्या जाेडीलाच कपाळावर गणपती बाप्पाची पट्टी..हातात श्रींची मूर्ती, आेठांवर मंगलमूर्तीच्या जयघाेषात बाप्पांची मिरवणूक काढण्यात अाली. पहाटेपासूनच मुहूर्त असल्यामुळे भक्तांनी आपापल्या सोईनुसार गणरायाची स्थापना केली. सकाळी दहानंतर बाजारपेठेत गर्दी झाली हाेती. पावसातही बाप्पांचे अागमन हाेत हाेते.