आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Cylinder Prices By Inhibition Of The Growth Of The MNS

गॅस सिलिंडर दरवाढीचा मनसेने केला निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात शहरातून निघालेल्या मोर्चात पदाधिकार्‍यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.
संतप्त कार्यकर्ते राजकमल चौकात एकत्र आलेत व त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चाने तहसील कार्यालयावर धडकले. तहसीलदार अनिल भटकर यांची भेट घेत कार्यकर्त्यांनी गॅस दरवाढीचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदनही दिले. शहराध्यक्ष राम पाटील, नीलेश कदम, बच्चू रेवडे, धीरज तायडे, नीतेश मेर्शाम, तुषार तायडे, जितू सारवान, सविता गिरी आदी या मोर्चात सहभागी झाले होते.