आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील इतर शहरांच्या तुलनेत अमरावतीत सर्वांत महाग गॅस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये चक्क पाणी निघाल्याने युवा सेना कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली. अंबाविहार परिसरात पोहोचवलेला गॅस सिलिंडर अर्ध्या तासातच संपल्याने हा धक्कादायक प्रकार लक्षात आला.
अंबाविहार परिसरात राहणारे सतीश अशोक धानोरकर यांच्या घरी मंगळवारी सकाळी घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पोहोचले. धानोरकर यांच्या आईने गॅस सिलिंडर लावल्यानंतर अर्ध्या तासातच सिलिंडर संपले. त्यामुळे धानोरकर यांनी सिलिंडर तपासले असता त्यात पाणी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे धानोरकर यांनी याबाबत युवा सेना कार्यकर्त्यांना कळवले.
राज्यातील अन्य महानगरांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर जादा असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडतोय. विदर्भातीलच अकोला आणि नागपूर या दोन शहरांची तुलना केली, तर अकोल्याच्या तुलनेत २६ रुपयांनी, तर नागपूरच्या तुलनेत अमरावतीत १४ रुपयांनी सिलिंडरचे दर अधिक आहेत.

विशेष म्हणजे संपूर्ण देशात अमरावतीच्या गॅस सिलिंडरचे दर तुलनेत सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. घरगुती ग्राहकांचे गॅस सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर सिलिंडर शुल्कातील ही तफावत आढळून आली आहे. मात्र, या गॅस सिलिंडरच्या वेगवेगळ्या किमती कशाच्या आधारावर काढण्यात येतात, हे गूढ कायम आहे.

घरगुती गॅस ग्राहकांसाठी असलेली थेट अनुदान हस्तांतरण योजना देशात जानेवारी पासून लागू झाली आहे. बाजारात अनुदानित आणि विनाअनुदानित असा दोन प्रकाराने गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. अनुदानित सिलिंडरची वार्षिक मर्यादा १२ एवढी मर्यादित आहे. मात्र, विनाअनुदानित सिलिंडर कोणीही खरेदी करू शकतो. यानुसार घरगुती गॅस ग्राहकांना विनाअनुदानित दरानेच सिलिंडर खरेदी करावे लागत आहे.

सर्व शहरांत समान दर असावेत
-अन्यशहरांच्या तुलनेत अमरावतीमधील गॅस ग्राहकाला प्रती सिलिंडर मागे २० ते २५ रुपये जादा मोजावे लागतात. हे दर सर्व शहरांत कायम असावेत. अमरावतीच्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंड का ? अक्षयवर्तक, घरगुतीगॅस ग्राहक

सांगता येणे अवघड
-नागपुरातीलसिलिंडर पुनर्भरण केंद्राला रेल्वे मार्गाने एलपीजी गॅसचा पुरवठा होतो. अमरावती नजीक असलेल्या केंद्रावर महामार्ग वाहतुकीद्वारे एलपीजी गॅसचा पुरवठा होतो. वाहतूक खर्च आणि स्थानिक कर यांमुळे हे दर अधिक असण्याची शक्यता आहे. अखिलेशयादव, गॅसवितरक
पुढील स्‍लाइडवर पाहा, गॅसचे वाढते दर..