आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राकाँ गटनेतेपदाचा निकाल लांबणीवर, आता १९ फेब्रुवारीकडे लागले लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडणूक घाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाचा विषय सोमवारी (दि. १६) पटलावर घेण्यात आला. परंतु, हा विषय तीन दवस पुढे ढकलण्यात आल्यामुळे राकाँ गटनेतेपदाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांसाठी आगामी २० फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. मनपातील पक्षीय बलाबलाच्या आधारे गटनेत्यांमार्फत नावे दिली जातील. त्यामुळे त्यापूर्वीच हा गुंता सुटावा, असे दोन्ही गटांना वाटत होते. मात्र, निकालाची तारीख पुन्हा तीन दिवस लांबणीवर पडल्याने दोन्ही गटांतील अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, आठ नव्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेवढ्या सदस्यांना संधी आहे, ती नावे (न्यायालयाच्या निर्देशानुसार) विद्यमान गटनेते सुनील काळे देणार आहेत. परंतु भविष्यात त्यांच्याच पदावर गदा आली, तर त्यांनी दिलेली नावेही रद्दबातल ठरतील, असा युक्तिवाद करीत २० फेब्रुवारीपूर्वीच या प्रकरणाचा निकाल घोषित केला जावा, असे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे.
असे आहे प्रकरण :अविनाश मार्डीकर सुनील काळे यांच्यादरम्यान गटनेतेपदाचा वाद उत्पन्न झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार सुलभा खोडके यांच्या समर्थनार्थ मार्डीकर यांनी राकाँ सोडली होती. त्या वेळी ते गटनेते होते. त्यानंतर पक्षाने काळे यांना गटनेते म्हणून निवडले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.