आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाविलगडावर चाळीस जणांनी अनुभवला थरार; ट्रेकिंग आठ ते 68 वयापर्यंतच्या 40 ट्रेकर्सनी घेतला सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- युथ हॉस्टेलच्या अमरावती शाखेतर्फे रविवारी घेण्यात आलेली ‘रिमझिम रिमझिम’ मान्सून गाविलगड पदभ्रमण (ट्रेकिंग) मोहीम यशस्वीपणे पार पडली. दिवसभर पाऊस कोसळत असल्यामुळे ट्रेकर्सच्या उत्साहाला उधाण आले होते. सकाळी सात वाजता एचव्हीपीएम येथून ट्रेकर्सला घेऊन निघालेली बस गाविलगड येथे पोहोचल्यानंतर ट्रेकिंगला सुरुवात झाली. पहिल्या तोफेवरून एकाचवेळी उंचावरून कोसळणारे दहा लहान-मोठे धबधबे डोळय़ांना सुखावत होते. उंचावरून जणू दुधाच्या धाराच धरती मातेला अभिषेक घालत आहेत, असा भास होत होता. असा देखावा जुलै महिन्यातच दिसतो. ते नयनरम्य दृश्य बघून आठ ते 68 वर्षे वयापर्यंतच्या सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला होता.
भर पावसात सुरू असलेल्या पदभ्रमणादरम्यानच हरिकेन पॉइंट व देवी पॉइंटला भेटी देऊन तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्याचा आनंद ट्रेकर्सनी घेतला. या मोहिमेत बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, डॉ. संतोष सदार, गायक श्रीकांत मेटकर, लिखितकर ट्रॅव्हल्सच्या संचालिका लिखितकर, दिलीप कुळकर्णी, कुलगुरूंचे सचिव आर. एम. जाधव, एलआयसीचे विकास अधिकारी अविन हाडके, प्रा. सतीश भागवत, अमरावती मनपा अभियंता टोपरे, बीएसएनएल अधिकारी गजानन गाडगीळ, धनुर्धर अथर्व कोळेश्वर, श्रीलेख वानखडे, अदिती गाडगीळ, रेणुका पांडे, तन्वी लिखितकर, डॉ. पारुल नांदगावकर, अँड. अतुल भारद्वाज, डॉ. उदय मांजरे, प्रा. विजय पांडे, प्रा. दीनानाथ नवाथे, केदार मोरोणे सहभागी झाले होते.