आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक तथ्य: नसानसांत खिलाडूवृत्ती अन् कलागुणही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भव्यदिव्य क्रीडा संकुलं, नाट्यगृह, शिक्षक, प्रशिक्षकांची उपलब्धता यांमुळे अंबानगरीच्या मातीतून चांगले खेळाडू आणि कलाकार घडतात, हे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. ही बाब अत्यंत वरकरणी आहे. वैज्ञानिक वस्तुस्थिती तर ही आहे, की अमरावतीकरांच्या रक्तात व शरीरात असे काही जनुकीय डीएनए जीन्स आहेत, जे एक तर उत्कृष्ट खेळाडू नाही तर चांगला कलाकार घडवत आहेत.
वाचून आश्चर्य वाटत असलं तरी ही वस्तुस्थिती आहे. अनुवंशिक-जनुकीयशास्त्र आणि मानसशास्त्रीय तज्ज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे. बहुतांश अमरावतीकरांच्या शरीराची जनुकीय (जेनेटिकल) रचनाच अशी आहे, की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास खेळाडू किंवा कलाकार म्हणून होतो. त्यामुळे अंबानगरीला क्रीडानगरी, सांस्कृतिक वारसा असलेली नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे डीएनए एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जातात. त्यामुळे अमरावतीत असेही अनेक लोक पहायला मिळतील, ज्यांच्या सलग तीन ते चार पिढय़ा एक तर क्रीडापटू आहेत किंवा कलावंत. त्यामुळे अमरावतीकरांच्या केवळ आपल्या मनातच खेळ आणि कलागुण बाळगताहेत असे नाही, तर त्यांच्या रक्तात व नसानसांतच खिलाडू वृत्ती व कलागुण आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
तीन पिढय़ा कुस्तीत
आमच्याकडे तीन पिढय़ा कुस्ती खेळण्याची परंपरा आहे. खेळाचा हा पिढीजात वारसा आम्ही जपला आहे. आमच्या रक्तातच खिलाडू वृत्तीचा गुण आहे.
-प्रा. संजय तीरथकर, कुस्तीपटू
मेंदूची जडणघडणही महत्त्वाची
कलाकार घडवण्यात जीन्स इतकाच महत्वाचा घटक आहे मेंदूची रचना. अमरावतीकरांमध्ये आढळणारी मेंदूची जडणघडण अशी आहे. रेक्टिक्युलर फॉर्मेशन : कलागुण विकसित करण्यासाठी. हायपोथॅलेमस : पेटिंग, चित्रकाम, आर्टवर्क. एमगडेला : संगीत व तत्सम. हिप्पोकॅम्पस : रंगसंगती. सेरेब्रल कॉर्टेक्स : एकूणच कलागुण. अमरावतीच्या कलाकारांमध्ये सर्वसाधारणपणे मेंदूचे हे भाग सक्रिय आढळले आहे.
एसीटीएन-2 घडवताहेत खेळाडू
माणसाच्या शरीरात जीन्स (जनुकीय घटक) त्याचे व्यक्तिमत्त्व घडवते. खेळाडूच्या शरीराच्या जनुकीय रचनेत अँसिटीन अल्फा-3 हे जीन्स आढळतात. एफ-अँक्टीन क्रॉस लिंकिंग प्रोटिन्समुळे व्यक्तीच्या नसानसांना बळकटी येते. अनेक खेळाडूंमध्ये एसीटीएन-2 आणि एसीटीएन-3 हा घटक आढळला आहे. अमरावतीमधील खेळाडूंमध्ये या जीन्स रचनेची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात सातत्य, चिकाटी आणि बळकट शरीरयष्टी दिसते. याच जीन्समधील एका प्रोटिनमध्ये बदल झाला, की कलाकार घडतो.
‘ग्रीनटेरा’मुळे घडताहेत अनेक कलाकार
यासाठी अँसिटीन अल्फा-2 हा महत्त्वाचा आहे. या जीन्समधील ग्रीनटेरा या प्रोटिन्समध्ये किंचित बदल झाला, की कलावंत घडतो. फरक इतकाच आहे, की खेळाडूचा एससीटीएन-2 किंवा एसीटीएन-3 हा जीन्स शरीरातील झेड-डिस्क संरचनेत असतो आणि कलाकाराच्या डीएनएतील जीन्समध्ये ग्रीनटेरा प्रोटिन्सचे प्रमाण आढळते. खेळाडू आणि कलाकार या दोघांमध्येही केवळ एका प्रोटिनचा फरक आहे. एसीटीएन 2 किंवा 3 हा जीन्स त्यात असल्याने खेळाडू घडो की कलावंत, त्यांच्यात सातत्य, चिकाटी आणि बळकट- वृत्ती हे गुण सारखेच असणार.
जीन्सने घडवले किती व्यक्ती
(तज्ज्ञांची संशोधनात्मक माहिती)
खेळाडू : 3 ते 4 हजार
गायन : 1 हजार ते 1500
वादन : 1 हजार ते सव्वा हजार
नृत्य : 2 हजार ते सव्वा दोन हजार
नाट्यकला : 1 हजार ते 1500
चित्रकला : 900 ते 1100
क्ले-मॉडेल : 750 ते 900
जेनेटिकल रचना आढळली
खेळाडू आणि कलाकारांमध्ये एसीटीएन-2 आणि एसीटीएन-3 ही जनुकीय रचना आढळली आहे. त्यावर अभ्यासही झाला आहे. अमरावतीत यावर संशोधन गरजेचे आहे.
-डॉ. गणेश वानखेडे, प्राणिशास्त्र व जेनेटिक्सचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ
पाच पिढय़ा संगीत आराधना
आमच्या पाच पिढय़ा संगीताची आराधना करीत आहेत. अगदी पणजोबांच्या वडिलांपासून आमच्याकडे हा वारसा आला आहे. आजही माझी पुढची पिढी ही आराधना करीत आहे.
-किशोर नवसाळकर, ज्येष्ठ तबलावादक