आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटलाडकीच्या शेतकऱ्यांचे सीएमंना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटलाडकी- शासनाच्यापाणी अडवा, पाणी जिरवा योजनेमुळे मात्र, येथील काही शेतकऱ्यांना शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ताच नराहिल्याने चांदूरबाजारच्या तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र, काहीही फायदा झाल्याने समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच थेट साकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित समस्या सोडवल्यास सोमवारी (दि. ६) आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील वारोळी येथे शासनाने राबवलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत सिमेंट बंधारे बांधण्याची योजना राबवली. परंतु, या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ताच राहिला नाही. या योजनेमुळे नदीचे पात्र खोल करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यास अडचण निर्माण झाली आहे. शेती पेरावी कशी, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
बंधाऱ्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत घाटलाडकी येथे राहणाऱ्या शेतकऱ्यांनी चांदूरबाजारच्या तहसीलदारांकडे तक्रार केली. परंतु, काहीही फायदा झाला नाही. शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्याने शेत पेरावे कसे, असा प्रश्न पडलेल्या विलास गांजरे, सुरेश कपले, विजय राजस, धर्मेंद्र राजस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. पाणी अडवा पाणी जिरवा योजनेमुळे शेतात जाण्यायेण्याच्या मार्गाची झालेली अवस्था.
आत्महत्येचा इशारा
शेतातयेण्या-जाण्यासाठी त्वरित रस्ता नाही मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ६) आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन याची कितपत दखल घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.