आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफल: मुशायराचा ‘गझलरंग’ रसिकांना भावला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वरुड मकरसंक्रांतीच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भाजप महिला आघाडीच्या वतीने डॉ. वसुधा बोंडे यांनी येथील आमदार निवासस्थानी हळदी-कुंकू, उखाणे स्पर्धा भाजप सदस्य नोंदणी कार्यक्रम शनिवारी (िद. १७) आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विदर्भ जिल्हा संघटन मंत्री रामदास अंबाडकर डॉ. वसुधा बोंडे, भारती देहंकर, मनीष मानेकर, विजया रहाटकर, सपना कोहळे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित महिलांनी उखाणे स्पर्धेत सहभाग घेऊन आपला उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमस्थळी महिला बचत गटांनी विविध स्टॉल लावले होते.

जन्मभरठेवेन कोरा सात-बारा
पण तिच्या मेंदीत माझे नाव यावे’
या जीवाचे रान झाले, छान झाले
पण तुझे गुणगान झाले, छान झाले’
शून्यही बाकी जरी खात्यात नाही
मीच काही एकटा घाट्यात नाही’

मराठी गझलांमधील असे एकाहून एक सरस गझल रविवारी (दि. १८) अमरावतीकर रसिकांची दाद मिळवून केले. सुरेश भट प्रतिष्ठान, अमरावतीद्वारा आयोजित सुरेश भट गझल मंच, पुणेद्वारा प्रस्तुत मराठी मुशायरा हा रंगतदार कार्यक्रम रविवारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियममध्ये साजरा झाला. महाराष्ट्रातील दहा गझलकारांनी आपल्या सादरीकरणातून अमरावतीकरांना अक्षरश: जिंकून घेतले.

हव्याप्रमंच्या ऑडिटोरियममध्ये गझलांच्या सादरीकरणाने रविवारची रात्र बहरत गेली. शहरातील रसिक, साहित्यिकांनी मराठी मुशायराचा आनंद घेत गझलकारांना भरभरून दाद दिली. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे, नाना लोडम, अंबाजोगाई येथील दगडूदादा लोमटे, वर्धा येथील रोहन भामकर आदींच्या हस्ते गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुणे येथील शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी मुशायराचे बहारदार सूत्रसंचालन केले. अमरावतीचे गझलकार अनंत नांदूरकर यांनी सुरुवातीला दोन रचना सादर केल्या. ‘दु:खास मी हसवले गझले तुझ्यामुळे..’ ‘प्रेम केले छान केले..’ यांसारखे विविध गझला सादर करत त्यांनी रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. प्रथम फेरीत प्रत्येक गझलकाराने दोन रचनांचे सादरीकरण केले. अकोला येथील चंद्रशेखर भुयार, चंद्रपूरचे किशोर मुगल यांनी अनुक्रमे सादरीकरण केले. पुण्याचे देवंेद्र गाडेकर, सुशांत खुरसाळे, यवतमाळचे सिद्धार्थ भगत, चंद्रपूरचे किशोर मुगल, अकोला येथील अमित वाघ यांनीही एकाहून एक रचना सादर केल्या.
सुरेश भट प्रतिष्ठानच्या गझलरंग या कार्यक्रमाचा शहरातील रसिकांनी आनंद घेतला.