आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेचा डायरियाने मृत्यू , नागरिकांना लागण, खापरखेडा येथे विहिरीच्या पाण्यामुळे साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खापरखेडा(ता. धारणी) येथे मागील दोन दविसांपासून दूषित पाण्यामुळे गावातील ७० ते ८० टक्के नागरिकांना डायरियाची लागण झाली असून, पार्वती जावरकर (वय साडेचार वर्षे) या बालिकेचा शुक्रवारी (दि. १९) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. नम्रता जावरकर शीतल नावाच्या दोन बालिका अत्यवस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्यावर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खापरखेडा हे धारणीपासून दहा िकलोमीटर अंतरावर आहे. अंदाजे १५०० ते २००० लोकसंख्येचे हे गाव आहे. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात २८ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅम्प लावण्यात आला असून, रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, पार्वती या बालिकेचा आज (शुक्रवारी) पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. डायरियाची सर्वािधक लागण बालकांना झाली असून, धारणी येथे डायरियाची लागण झालेल्या दहा महिला, दहा बालके चार पुरुषांवर उपचार सुरू आहेत.

साथ नियंत्रणात
खापरखेडायेथील डायरियाची साथ नियंत्रणात असून, वैद्यकीय पथक पाठवण्यात आले आहे. यात साथरोग तज्ज्ञांचाही समावेश असून, रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉ.सुरेश आसोले, प्रभारीजिल्‍हा वैद्यकीय अधिकारी
विहिरीच्या पाण्यामुळे डायरिया
सध्यापावसाळ्याचे दविस असून, गावात पुरेसा वीजपुरवठाही होत नसल्यामुळे गावातील नागरिकांची तहान विहिरीच्या पाण्यावर भागवली जाते. विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे डायरियाची लागण झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.