आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता खेळता कालव्यात पडून मुलीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या भानखेडा परिसरातील परलाम शिवारात एका 14 वर्षीय मुलीचा कालव्यात पडून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनेरा-लोणटेक रस्त्यावर असलेल्या भानखेडा येथील रहिवासी मका भवान मिर (40) यांची मुलगी पम्मू (14) ही बुधवारी सायंकाळच्या सुमारास परलाम शिवारातून जाणार्‍या कालव्यानजीक खेळत होती. पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती पाण्यात कोसळली. यावेळी तिला वाचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.