आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवरच बलात्कार करणार्‍या अत्याचारी पित्याला ११ वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील एका १९ वर्षीय युवतीवर तिच्याच पित्याने एकदा नव्हे तर वारंवार अत्याचार केला. यातून मुलीला गर्भधारणा झाली होती. चार ते पाच महिने मुकाट्याने अत्याचार सहन केल्यानंतर या नराधम पित्याची करतूद अखेर निसर्गनियमाने बाहेर आली. त्यामुळे सदर प्रकरणात त्या पित्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. गुरूवारी (दि. ७) येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक १) एस. एस. दास यांच्या न्यायालयाने या नराधम पित्याला अकरा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार, बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या या नराधमाचे वय ५५ वर्ष आहे. पीडीत असलेली या पित्याची द्वितीय मुलगी आहे. त्याला चार मुली, एक मुलगा पत्नी आहे. मोठ्या मुलीचा चार वर्षांपुर्वीच विवाह झाला आहे. जानेवारी २०१३ ची ही घटना आहे. मोठ्या मुलीची प्रकृती ठिक नसल्यामुळे सदर मुलीची आई मोठ्या मुलीच्या घरी गेली होती. यावेळी त्याने मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर सदर प्रकरणाची कोठेही वाच्यता केल्यास तुझ्यासह तुझ्या आईला मारेल, अशीही धमकी दिली. या धमकीमुळे ती मुलगी घाबरली तिने आपल्या आईजवळसुध्दा झालेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतर दोन महिन्याने सदर पीडीत मुलीच्या आईची प्रकृती खराब झाली त्यामुळे तीला अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल केले. जवळपास दहा दिवस मुलीची आई उपचारासाठी रुग्णालयात होती.

या दरम्यान पाच ते सहावेळा या नराधम पित्याने पुन्हा बलात्कार केला. पुन्हा तशीच धमकी दिली. त्यामुळे या प्रकाराबाबत तिने वाच्यता केली नाही. पुढील काळात मे २०१५ मध्ये पिडीताची मोठी बहीण ही माहेरी आली. त्याच दरम्यान पीडीत मुलीला अस्वस्थ वाटले म्हणून मोठ्या बहीणीसोबत ती डॉक्टकडे गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. यानंतर मुलीने आईला वडिलांनी केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. झालेल्या प्रकाराबाबत पिडीत मुलीने बहीनीसह २८ मे २०१३ ला बडनेरा पोलिस ठाण्यात धाव घेवून पित्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पित्याविरुध्द बलात्कार जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

तपास पुर्ण होताच जुलै २०१३ ला पाेलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सहा साक्षिदारांच्या साक्ष तपासल्या. नराधम पित्याविरुध्द दोष सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने त्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अकरा वर्षांची सक्त मजूरी तसेच पाच हजार रुपये दंड, दंड भरल्यास तीन महीने अतिरीक्त कारवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून अॅड. प्रकाश शेळके यांनी युक्तीवाद केला.

पीडित मुलीसह आई बहिणीची साक्ष महत्त्वाची
सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सहा साक्षिदारांच्या साक्ष तपासल्या. यावेळी पिडीत मुलगी, तिची मोठी बहीण आई या तिघींची साक्ष महत्वाची ठरली असून त्याच ग्राह्य धरून आरोपी पित्यावर दोष सिध्द झाला. त्यामुळेच न्यायालयाने कलम ३७६ (२) अन्वये त्याला अकरा महीने सत्कमजूरी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. घटनेपासून आरोपी हा कारागृहातच आहे. अॅड.प्रकाश शेळके, सहायक सरकारी वकील.
बातम्या आणखी आहेत...