आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विचित्र हावभाव करणा-यास विद्यार्थिनींनी चोपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मुलींच्यावसतिगृहासमोर उभे राहून विचित्र हावभाव करणा-यास विद्यार्थिनींनी चोप देऊन वडगावरोड पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना येथील शिवाजी उद्यानाशेजारी असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहासमोर गुरुवारी सायंकाळी साडपाच वाजताच्या सुमारास घडली. सहदेव नीळकंठ मोहोड वय ५६ रा. पिंपळगाव असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहदेव सायंकाळच्या वेळी या वसतिगृहापुढे उभा राहुन मुलींकडे बघत होता. त्यावेळी तो विचित्र हावभाव करत असल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनींनी वसतिगृहातील शिक्षिकांसोबत त्या ठिकाणी जाऊन त्याला चांगलेच धारेवर धरत चोप दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वडगावरोड पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून सहदेवला ताब्यात घेतले. त्यानंतर वसतिगृहातील शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शहरासह जिल्ह्यात मुलींना अश्लिल हावभाव करुन त्यांची छेड काढण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत.