आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनी अन् पोलिसांच्या तत्परतेने चोरटा गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलपन्नालालनगरातील एका प्राध्यापकाच्या घरात चोरटे घुसले. या वेळी परिसरात राहणारी एक विद्यार्थिनी अभ्यास करत होती. चोरट्यांची चाहूल लागताच तिने प्राध्यापकाच्या घरातील भाडेकरूंना ही माहिती दिली.

भाडेकरू उठल्यामुळे प्राध्यापकाच्या घरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांनी तेथून पळ काढला. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, राजापेठ पोलिस तत्परतेने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अवघ्या एका तासात त्या चोरट्याला अटक केली. पन्नालालनगरमध्ये प्रा. रवींद्र आनंदराव प्रांजळे यांचे घर आहे. त्यांच्या घरात प्रल्हाद शंकरराव गवई हे आपल्या परिवारासह भाड्याने राहतात. प्रा. प्रांजळे हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या घरात कोणीही नव्हते. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास प्रा. प्रांजळे यांच्या घरात चोरटे असल्याची चाहूल परिसरातील एका घरात अभ्यास करत असलेल्या विद्यार्थिनीला लागली. तिने गवई यांना दूरध्वनीवरून प्रांजळे यांच्या घरात चोरटे शिरल्याबाबत माहिती दिली. गवई यांची खात्री पटताच त्यांनी तत्काळ राजापेठ पोलिसांना याबाबत कळवले आणि बाहेर येऊन आवाज दिला. दरम्यान, प्रांजळे यांच्या घरात शिरलेले चोरटे पळाले. तेवढ्यात पोलिस पथकही प्रांजळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. रात्रगस्तीवर असलेल्या राजापेठच्या डी. बी. पथकाचे प्रमुख राजेश सपकाळ, खुशाल तायवाडे, पवन घोम, प्रदीप ठाकरे यांनी परिसरात चोरट्यांची शोध मोहीम राबवली. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास एकाला पकडण्यात त्यांना यश आले आहे. रवि किसन खडसे (२४, रा. बेलपुरा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

'फर्स्ट इन्फॉरमेशन' शेजारधर्माचे उत्तम उदाहरण
चो-यारोखण्यासाठी पोलिस प्रयत्नरत आहेत. मात्र, पोलिसांना नागरिकांनी सहकार्य केल्यास चोरट्यांचे डाव उधळले जाऊ शकतात. याचे ज्वलंत उदाहरण पन्नालालनगमध्ये शनिवारी अनुभवास आला. अभ्यास करणा-या विद्यार्थिनीने शेजारधर्म आणि धाडस दाखवून गवई यांना माहिती दिल्यामुळे चोरीची घटना टळली. शिवाय गवई यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यामुळे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.