आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी दोन मुलींचे अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन मुलींचे एकाच दिवशी अपहरण केल्याचे उघडकीस आले. पळवून नेणार्‍या दोन युवकांची नावे तक्रारदाराने दिली असून, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुली एकमेकांच्या नातेवाईक असून, त्या घनिष्ठ मैत्रिणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपहृत दोघी मुली अमरावती येथे एका महाविद्यालयात शिकतात. त्यांचे वय अनुक्रमे 17 व 15 वर्षे आहे. मार्चपूर्वी त्या दोघीही घरून निघाल्यानंतर परतल्या नव्हत्या. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्या सापडल्या नाहीत. चौकशीनंतर त्यांना बुधवारा परिसरातील मुलींच्याच महाविद्यालयात शिकणारे शुभम बद्रे आणि शेवती येथील सूरज गवळी या युवकांनी फूस लावून पळवून नेल्याचे समजले. या प्रकरणी एका मुलीच्या वडिलाने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या दोन्ही युवकांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी (दि. 19) रात्री फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला.