आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामानेच अत्याचार केल्याची युवतीची ऑनलाइन तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथे राहणाऱ्या मामानेच आपल्यासोबत लैंगिक कृत्य केल्याची ऑनलाइन तक्रार मुंबईतील १६ वर्षीय युवतीने शहर पोलिसांकडे केली आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी तक्रारीवरून शुक्रवारी त्या मामाविरुद्ध बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत राहणाऱ्या या युवतीने आपल्या तक्रारीत मामाने १६ सप्टेंबरला आपल्यासोबत असभ्य वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या वेळी आपला भाऊ बहीणसुद्धा हजर होते, असेही तिने पोलिसांकडे पाठवलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदार युवतीची आई काही दविसांपासून पतीपासून वेगळी माहेरी राहत आहे. ही युवती तिचे भावंड मुंबईला वडिलांसोबत राहते. १६ सप्टेंबरला ती भावंडांसोबत मामाकडे आईला भेटण्यासाठी आली असता मामाने घरातच गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील प्रकरण असून वरिष्ठ पोलिसांनी शुक्रवारी फ्रेजरपुऱ्यात वर्ग केले. मामाविरुद्ध बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरू
युवतीनेमामाविरुद्ध ऑनलाइन तक्रार दिली आहे. संबंधितावर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. रियाजोद्दीनदेशमुख,
ठाणेदारफ्रेजरपुरा.
युवतीनेमामाविरुद्ध ऑनलाइन तक्रार दिली आहे. संबंधितावर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. रियाजोद्दीनदेशमुख, ठाणेदारफ्रेजरपुरा.