आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलभूत सुविधा द्या अन्यथा मालमत्ता कर भरणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मुलभूत सुविधा द्या अन्यथा मालमत्ता कराचा भरणा करणार नसल्याचा इशारा तपोवन येथील नागरिकांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना आज (१० जून) दिला. विकास शुल्काचा निधी इतरत्र वळविल्या जात असल्याचे देखील आयुक्तांना निदर्शनास आणून दिले. शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महापालिकेवर धडक दिली.शहाराच्या विविध भागात शासकीय निधीत काँक्रीट डांबरी रस्ते होत असताना तपोवन परिसराचा विकास त्या तुलनेत झाला नाही.
सत्ताधारी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने तपोवन प्रभागात तोकडा निधी मिळाला. मोठ्या इमारती, फ्लॅट प्रणालीचे घरे असल्याने विकास शुल्काचा देखील भरणा करण्यात आला आहे. विकास निधी भरल्यांनतर देखील येथील विकास करण्यात आला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. १९९० पासून या भागात नागरी वस्ती असताना देखील अद्याप प्राथमिक सोयी-सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. विकास शुल्क म्हणून भरण्यात आलेला निधी डीपी प्लॅनमध्ये वळविण्यात येत असल्याने विकास कामांवर त्याचा परिणाम होत आहे. नाल्यांवर संरक्षण भिंत बांधणे.
अंबिका नगरातील अतिक्रमण काढणे, खुल्या विहिरींवर झाकण बसवणे. सात बंगला येथील नागरिकांना रस्ता प्रकाशाची व्यवस्था करुन देणे. स्वामी समर्थ दीप प्रतिष्ठान परिसरातील रस्ते दुरुस्ती करणे. येथील रस्त्यांचे खडीकरण करणे. संत गाडगेबाबा कॉलनीत नाल्या रस्तेच नाही.
माधवी विहार गॅस गोडाऊन प्रभागात साधे खडीकरण देखील करण्यात आले नाही. दत्त कॉलनी, आशा कॉलनी, अंबिका नगर येथील रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तपोवन मोठा परिसर असताना एक ही उद्यान नसल्याचे देखील निवेदनातून निदर्शनास आणून दिले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
आयुक्तांच्या घरी मुक्काम
तपोवन परिसरातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केल्यास आयुक्तांच्या घरी मुक्कामी राहण्याचा इशारा निवेदनातून या वेळी निवेदनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. जंगलाचा भाग असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा त्रास असतो. विजेची व्यवस्था, रस्ते नसल्याने नागरिकांच्या जीवाला देखील धाेका निर्माण हाेतो. निवेदनाची दखल घेतल्यास येथील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आयुक्तांच्या घरी मुक्काम
तपोवन परिसरातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केल्यास आयुक्तांच्या घरी मुक्कामी राहण्याचा इशारा निवेदनातून या वेळी निवेदनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. जंगलाचा भाग असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा त्रास असतो. विजेची व्यवस्था, रस्ते नसल्याने नागरिकांच्या जीवाला देखील धाेका निर्माण हाेतो. निवेदनाची दखल घेतल्यास येथील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अनुराधा कॉलनीतील रस्त्याचे खडीकरण करा...