आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदकावर चोरट्यांनी मारला डल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून ओएनजीसीमध्ये मुख्य अभियंत्याने कमावलेल्या सुवर्णपदकावरच चोरट्यांनी हात साफ केला. रविवारी रात्री शहरातील शेगाव परिसरातील अभिनव कॉलनीमध्ये ही चोरी झाली.

मधुकर भीमराव मेर्शाम (58) यांच्या घरातून चोरट्यांनी सुवर्णपदकासह अन्य दागिने चोरून नेले. मेर्शाम हे ओएनजीसीमध्ये मुंबई येथे मुख्य अभियंता पदावर कार्यरत आहेत. कंपनीतील उत्कृष्ट कार्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांना 10 ग्रॅम वजनाच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. हे सुवर्णपदक त्यांनी अभिनव कॉलनी येथील घरी ठेवले होते. रविवारी मेर्शाम दाम्पत्य बाहेर, तर त्यांची मुलगी सुश्री क्लासला गेली होती. ही संधी साधून चोरट्यांनी 10 ग्रॅमच्या सुवर्णपदकासह अन्य दागिने, असा 40 हजारांचा ऐवज घरातून लंपास केला. या प्रकरणी मेश्राम यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, शहरातील इतवारा बाजार परिसरात शेख मसूद हाजी शेख महमूद (42 वर्षे) यांच्या कापडविक्रीच्या दुकानाचे टिन वाकवून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील काऊन्टरमध्ये ठेवलेले 15 हजार रुपये चोरट्यांनी नेले. या प्रकरणी शेख मसूद हाजी शेख महमूद यांच्या तक्रारीवरून कोतवाली पालिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पदक गेल्यामुळे दु:ख झाले
चोरट्यांनी घरातून सुवर्णपदक चोरल्यामुळे दु: ख झाले आहे. उत्कृष्ट कामाचे प्रतीक म्हणून मिळालेली ती अनमोल भेट होती. पोलिसांनी त्याचा शोध लवकर घ्यावा. मधुकर मेश्राम