आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य आहाराने रोगाला हरवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आजच्या धकाधकीच्या काळात सकस आहार घेण्याकडे थोडे दुर्लक्षच होत आहे. ‘हेल्दी कूकिंग’बाबत जागरूकता दिसून येत असली तरी वेळेअभावी ते शक्य होत नाही. घरातल्या स्त्रीने सकस आहाराकडे लक्ष दिले, तर कुटुंबातील सदस्यांनाही सकस आहार मिळेल. आले ते गिळू केले, तर आरोग्याच्या दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागेल, असे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

वैविध्याने नटलेल्या भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे अन्नपदार्थ तयार होतात. देशात जितकी राज्ये आहेत, तितके पारंपरिक पदार्थ, पाककृती आणि त्या बनवण्याचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहेत. आपण नेहमी अमुक एक पदार्थ चांगला किंवा वाईट, असं वाचतो आणि ऐकतो. पण, ते पदार्थ कसे घ्यावेत, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. अन्नपदार्थ कितीही पोषक असला तरी तो डोळ्यांना भावणारा आणि चवीनंही चांगला असला पाहिजे. तेव्हाच तो घेतला जाईल आणि त्याचा आपल्याला उपयोगही होईल, असे मत गृहिणींनी व्यक्त केले.

आहारतज्ज्ञांच्या मते, आरोग्य आणि आहाराचा अतिशय जवळचा संबंध आहे. आपण जितकी फळे आणि भाज्या खाऊ, तितके चांगले. नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया यामुळे सुरळीत होते. पुरुषांना 2,300 कॅलरी आणि स्त्रियांना 1,790 कॅलरी ऊर्जेची दररोज आवश्यकता असते. कष्टाची कामे करणारे किंवा खेळाडू यांना अधिक कॅलरीची आवश्यकता असते. गरोदर तसेच स्तनदा मातांना 2,300 कॅलरीचा आहार लागतो. ज्येष्ठ नागरिकांना 2,000 ते 2,200 कॅलरीचा आहार पुरेसा ठरतो. या कॅलरीज दररोजच्या आहारातून मिळणे आवश्यक आहे.

आहार म्हणजे काय?
आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयाचे स्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. कबरेदके, प्रथिने व मेद हे ऊर्जा निर्माण करणारे आहारातील तीन मुख्य घटक आहेत. जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ हे अन्य आवश्यक घटक आहेत. शरीरस्वास्थ्य व रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी समतोल आहार आवश्यक असतो.