आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये 'इर्विन'लाच चढला ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्‍हातसाथरोगांनी कहर केला असून लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. डेंग्यू, टॉयफाइड, व्हायरल फिव्हरसह साथरोगांमध्ये वाढ झाल्यामुळे जिल्‍हा सामान्य रुग्णालय फुल्ल झाले आहे. गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार या आजारांची रुग्णसंख्याही वाढली असून जुलाब, उलटी, अंगदुखी, थंडी वाजून ताप, यासारख्या आजारांमुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे.

मागील पंधरवाड्यात सुमारे साडेनऊ हजार रुग्णांनी ओपीडीला भेट दिली आहे. एक ते सात सप्टेंबरदरम्यान चार हजार ६० रुग्ण ओपीडीत उपचारासाठी दाखल झाले, तर सात ते १४ सप्टेंबरदरम्यान पाच हजार ३८९ रुग्णांनी भेट दिली. यामध्ये ताप साथरोगांचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे आठवडा अहवालातील आकडेवारीनरुन स्पष्ट होते. त्याखालोखाल टॉयफाइडचे रुग्ण आढळले आहेत. मागील पंधरा दिवसांमध्ये ६८८ रुग्णांचे रक्त नमूने तपासण्यात आले असून १६६ पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे, डायरियामध्येही वाढ झाली आहे.

सामान्य दिवसांमध्ये प्रत्येक आठवड्याला सरासरी तीन हजार रुग्ण ओपीडीला भेट देतात. परंतू, पावसामुळे आजारांनी डोके वर काढले असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तथापि, इतर दिवसात आठवड्यात साधारणत: सरासरी हजारच्या जवळपास रुग्ण आेपीडीला भेट देतात. परंतु, अवकाळी पावसामुळे मागील पंधरवाड्यात विविध आजार बळावल्याने विविध रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजारांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, साथ रोग, ताप व्हायरल फिव्हरसारख्या आजारांत वाढ झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. कुठलाही ताप अंगावर घेता, योग्य वैद्यकीय सेवा घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. विशेषत: रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्‍हा सामान्य रुग्णालय सज्ज आहे. इर्विनमध्ये दररोज मोठ्याठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे.

अवकाळी पाऊस वातावरणातील बदलांचा परिणाम
अवकाळीपाऊस वातावरणातील बदलामुळे विविध आजारांत वाढ झाली आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हेक्टर फॉल प्रकारातील मलेरीय डेंग्यूसारख्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी मुबलक औषध साठा वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. डॉ.अरुण राऊत, जिल्हाशल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय.

याचे रुग्ण अधिक
गॉस्ट्रो,कॉलरा, अतिसार एन्टारायटिस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. जुलाब, उलटी, अंगदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, थंडी वाजून ताप येणेसारख्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजारापासून आपला बचाव कसा करावा, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. डेंग्यूसारख्या आजारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंग्यूवर कुठलाही उपचार नसून केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या आजारावर मात करता येते, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. डेंग्यूचा आजार होऊन त्यावर उपचार करण्यापेक्षा तो होणारच नाही, यासाठी सप्ताहात कोरडा दिवस पाळणे, ताप अंगावर घेणे, परिसर स्वच्छ ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

इबोला,स्वाईन फ्ल्यूसाठी आयसोलेटेड वॉर्ड
सध्याइबोला स्वाईन फ्ल्यू सारखा महाभयंकार आजाराची लागण जिल्ह्यात होणार नाही, याची पूर्ण दक्षता जिल्‍हा सामान्य रुग्णालयाने घेतली आहे. त्यासाठी रुग्णालयातच आयसोलेटेड वॉर्डची स्थापना करण्यात आली आहे. यासंबंधी दक्षता घेतली जात आहे.