आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी रयतेचे, म्हणून रयत त्यांची- अँड. गोविंद पानसरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिवाजी महाराजांनी रयतेची (जनतेची) काळजी केली म्हणून जनतेने शिवाजी महाराजांची काळजी केली. ते केवळ एवढय़ावरच थांबले नाहीत, तर शेतकर्‍यांच्या पिकांची, रयतेच्या संपत्तीची, त्यांच्या अब्रूची त्यांनी राखण केली. हे इतर कोणाही राजाला जमले नाही म्हणून इतरांपेक्षा त्यांची ओळख अधिक आहे.
‘शिवाजी कोण होता’ या विषयाची मांडणी करताना प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ कम्युनिस्ट अँड. गोविंद पानसरे बोलत होते. आम्ही सारे फाउंडेशन आणि निळूभाऊ फुले सामाजिक अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कवी नारायण सुर्वे यांचा चतुर्थ स्मृतिदिन हा या आयोजनामागचा उद्देश होता. पानसरे पुढे म्हणाले, शिवाजींनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची जमीन मोजली. त्यात किती व कोणती पिके येतील, याचीही मोजदाद केली.
त्यानुसार शेतसारा ठरवला. त्यांनी त्याकाळी अनेक सुधारणा केली. मात्र, त्यांचे नाव घेऊन राज्य करणार्‍यांना हे जमले नाही. किंबहुना स्वत:ची अडचण वाढू नये म्हणून खरे शिवचरित्र लोकांपुढे येऊच द्यायचे नाही, अशी त्यांची कृती आहे, असे परखड मत व्यक्त केले.
शिवचरित्र अधिकृतपणे लिहिल्या जावे, यासाठी राज्य सरकारने लाखो रुपये खर्च केले. परंतु, अजूनही ते शक्य झाले नाही, यावरील टीकाही पानसरे यांच्या व्याख्यानातून सुटली नाही. मला शिवाजी महाराजांवर बोलायला आवडतं आणि प्रलोभनाच्या या काळातही ‘आम्ही सारे’ने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.मंचावर कवी र्शीकांत देशमुख, डॉ. मनोज तायडे, विजय विल्हेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी मंत्री सुरेंद्र भुयार, आमदार बी. टी. देशमुख, अँड. अरुण शेळके, डॉ. गणेश पाटील, रामेश्वर अभ्यंकर, प्रा. महेंद्र मेटे, प्रा. मीनाताई गावंडे, कामगारांचे पुढारी पी. बी. उके, अँड. र्शीकांत खोरगडे, प्राचार्य भा. वा. चौखंडे, प्राचार्य रमेश अंधारे, बाबा भाकरे आदी उपस्थित होते.