आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय ‘गोविंदा’ दुष्काळात शासकीय पाण्याने भिजले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सरासरीपेक्षाकमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असतानाही अमरावतीत राजकीय ‘गोविंदा’ शासकीय पाण्याने भिजल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपालांचे दिशा-निर्देश डावलत रविवारी जनतेच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या अग्निशमन सेवेचा दुरुपयोग करण्यात आला. राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या तीन दहीहंडीमध्ये सुमारे दीड लाख लिटर पाण्याची उधळपट्टी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
जन्माष्टमीचे औचित्य साधत शहरात राजापेठ, नेहरू मैदान जयस्तंभ चौकात अनुक्रमे आमदार रवि राणा, आमदार प्रवीण पोटे मित्रमंडळ आणि युवा सेनेच्या दहीहंडीचा समावेश आहे. वर्षभराच्या तुलनेत पावसाची सरासरी कमी असल्यामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे. राज्य शासनाने पहिल्या यादीत १२३ तालुक्यांचा समावेश केला आहे. जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये दुष्काळाचे चित्र असून, सिंचन प्रकल्पांच्या पातळीतही समाधानकारक वाढ झालेली नाही. अवर्षणाचे संकट ठाकले असताना अशाप्रकारे पाण्याच्या उधळपट्टीवर शहरातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांची शक्तिप्रदर्शनासाठी शासकीय शासकीय अग्निशमन वाहनांतून लाखो लिटर पाणी उधळणे कितपत योग्य, असा प्रश्नही सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पैसे वसूल करू
रितसरअर्ज दिल्यानंतर दहीहंडी स्पर्धेच्या आयोजकांना पाणी देण्यात आले. पाण्याचा वापर केल्यानंतर आयोजकांकडून त्याबाबत पैशांचा भरणा करण्यात आला किंवा नाही, याची माहिती संबंधित विभागाकडून घेतली जाईल. पैशांचा भरणा करण्यात आला नसेल, तर त्यांच्याकडून नियमानुसार रक्कम वसूल करण्यात येईल. रमेशमवासी, उपायुक्तमहापालिका.