आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही कायदा सुव्यवस्था चोख राहील आणि आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, या दृष्टीने निवडणूक यंत्रणेने दक्ष राहावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज अमरावती यवतमाळ जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेत.
शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सहारिया यांनी अमरावती यवतमाळ जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीचा सविस्तर आढावा घेतला. अमरावती यवतमाळ जिल्ह्यांतील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जुलै २०१५ पर्यंत संपत आहे, त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीत मतदान मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे; तसेच निवडणूक निर्भय शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी जनजागृती करावी अशी सूचना सहारिया यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या २००६ च्या निर्णयानुसार निवडणुकीची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.
उमेदवाराच्या निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे; तसेच उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील विहित मुदतीत सादर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. या वेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत यंत्रणेद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रारंभी विभागीय आयुक्त राजूरकर यांनी निवडणूक आयुक्त मान्यवर अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी किरण गित्ते राहुल रंजन महिवाल यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. बैठकीला अमरावती यवमाळ जिल्ह्यांचे निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे. एसएमएस, वॉट््सअॅप या नवमाध्यमांद्वारे निवडणुकीच्या माहितीचे आदानप्रदान करावे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांसह अन्य सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचनाही सहारिया यांनी या बैठकीत केली.राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी विभागीय आयुक्तालयात ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा घेतला.

यांची होती प्रमुख उपस्थिती

बैठकीला पोलिस महासंचालक संजीव दयाळ, अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, निवडणूक सचिव प्रदीपकुमार व्यास, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांच्यासह विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते, यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी (अमरावती), डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (यवतमाळ), पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू (अमरावती), संजय दराडे (यवतमाळ) आदि प्रमुख्याने उपस्थित होते.

सर्वांनी घ्यावी दक्षता

निवडणुकांमध्ये झालेल्या बदलांची माहिती घेत तक्रारी तसेच कायदा सुव्यवस्था बिघडणार नाहीत, याबद्दल सर्वांनी दक्षता घ्यावी, असे अप्पर मुख्य सचिव के. बी. बक्षी यांनी बैठकीत सांगितले. निवडणूक सचिव प्रदीपकुमार व्यास यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.