आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसेवकांचा जिल्हा कचेरीवर संप सुरू अन् काम ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सद्य:स्थिती : दोन जुलैपासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील 843 ग्रामपंचायती सांभाळणार्‍या सुमारे 650 ग्रामसेवकांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व त्यांची स्वत:ची आस्थापना असलेल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना नोटीस देऊन काम बंद केले.
परिणाम : ग्रामपातळीवरील प्रत्येक दाखला ग्रामसेवकांमार्फतच मिळवावा लागतो. कर भरल्याचा पुरावा, रहिवासी दाखला, जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसह शैक्षणिक सवलतींसाठींचे विविध दाखले ग्रामसेवकांकडूनच मिळवावे लागतात. मात्र, ग्रामसेवकांनी स्वत:च त्यांच्या कार्यालयांना टाळे लावल्यामुळे संपूर्ण कामे ठप्प पडली आहेत.
ग्रामविकासाबाबत ग्रामपंचायतींचे निर्णयही त्यांच्याविना होऊ शकत नाहीत. मागण्या : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी बंद करा; ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करा; कंत्राटी ग्रामसेवकांना शिक्षकांप्रमाणे सेवेत सामावून घ्या; 20 ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी द्या; सर्व संवर्गांसाठी बदलीचे एकसमान धोरण ठेवा आदी.

समाजकल्याणवाले महसूलवर भारी; नगरपालिका कर्मचार्‍यांचा मोर्चा : मागील आठवड्यातच सामाजिक न्याय विभागातील कर्मचार्‍यांनीही आंदोलन केले. जातवैधता (व्हॅलिडिटी) प्रमाणपत्रांच्या वितरणात प्रचंड प्रलंबितता असतानाही दोन दिवस या समित्यांची कामे बंद होती. जातवैधता प्रमाणपत्र देणार्‍या समित्यांचे अध्यक्षपद अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या महसूल अधिकार्‍यांकडे असू नये, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचाच अधिकारी नेमला जावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. दोन दिवसांच्या लढय़ानंतर शासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे हा लढा थांबला. दरम्यान, नगरपालिका कर्मचार्‍यांनीही एक दिवस मोर्चा काढून कामकाज बंद पाडले होते.