आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीच्या कामातही संगनमताने झाला भ्रष्टाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हिंदू स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामाची पाहणी करताना आमदार बुंदिले सीओ बोरकर. )
अंजनगावसुर्जी - गेल्यावर्षभरापासून विविध समस्यांनी गाजलेली येथील नगर परिषद पुन्हा एकदा हिंदू स्मशानभूमीच्या विकासकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराने चर्चेत आली आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरप्रकार घडला आहे. दरम्यान, आमदार रमेश बुंदिले यांनी स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
प्रत्येक व्यक्तीला शेवटचा श्वास थांबल्यानंतर अंतिम क्षणी ज्या स्मशानभूमीत विश्रांती घेतली जाते. तिथेही काही महाभागांनी पैशाच्या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची बाब पुढे आली. खोडगाव मार्गावरील हिंदू स्मशानभूमीमध्ये १३ व्या वित्त आयोगामधून लाख ३७ हजार रुपयांचा निधी मिळाला. यामध्ये स्माशानभूमीचा रस्ता काँक्रिटीकरण खुल्या जागेमध्ये रबर पेव्हर ब्लॉकच्या विकासकामांचा समावेश होता. हे काम अ. अजहर अ. अजीज या ठेकेदाराला देण्यात आले. या कामामध्ये वापरण्यात आलेले दगड हे निकृष्ट दर्जाचे आहेत. यामध्ये चांगल्या दगडांऐवजी फुटलेले दगड लावण्यात आले आहेत. केलेल्या कामाचा दर्जादेखील निकृष्ट आहे.
निकृष्ट कामाच्या दर्जाची तक्रार प्रभागाच्या नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्याकडे केली असून, त्यावर त्वरित चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीचे विकासकाम हे आठ दिवसांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, या कामाचे देयक तत्कालीन अभियंता मनीष चोमवाल यांनी २० दिवसांपूर्वीच काढले. त्याची रक्कमही ठेकेदाराला मिळाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करताच बिल अदा करण्यात आले.
सत्तारूढ पक्षाचे विकासकामांकडे किती लक्ष आहे, हे यावरून लक्षात येते. स्मशानभूमीच्या विकासकामातच जर अशी परिस्थिती आहे, तर सर्वसामान्य विकासकामांची काय स्थिती असेल, याबाबत बोललेलेच बरे. नागरिकांनीही सत्तारूढ पक्षाबाबत रोष व्यक्त केला आहे. स्मशानभूमीच्या कामाची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
नगरसेविकेनेकेली सीओंकडे तक्रार: प्रभागामध्येयेणाऱ्या स्मशानभूमीमध्ये झालेल्या बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे लक्षात येताच नगरसेविका मुरकुटे यांनी याबाबत सीओंकडे तक्रार दाखल केली.
कारवाईचे आदेश
हिंदू स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामाची पाहणी करताना आमदार बुंदिले सीओ बोरकर.