आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रे प्लवरची विदर्भामध्ये प्रथमच नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलवाइल्ड लाइफ अँड एन्व्हायर्नमेंट कंझर्व्हेशन सोसायटीच्या वतीने (वेक्स) हिवाळी पाणपक्षी अभ्यासादरम्यान अकोला परिसरामध्ये ग्रे प्लवर जॅक स्नाइप या दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. ग्रे प्लवर पक्ष्याची नोंद ही विदर्भातील प्रथम असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘वेक्स’चे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार, किरण मोरे, निनाद अभंग यांनी या दोन पक्ष्यांची नोंद घेतली आहे. हे पक्षी सध्या अकोलालगतच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर दगड पारवा तलावावर वास्तव्यास आलेले आहेत.

ग्रे प्लवर या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ‘प्लूवीएलीस स्क्वाटारोला’ असे असून, चिखलपक्षी अर्थात वेडर्स प्रकारातील हा पक्षी हिवाळ्यादरम्यान युरोपातून स्थलांतर करून भारताच्या समुद्रकिना-यावर येतो. भारताच्या भूभागावर मोठ्या नद्यांवर या पक्ष्याच्या क्वचितच नोंदी होत असतात. तासन््तास निरीक्षण करून या पक्ष्यांच्या सवयी ओळखून त्यांची ओळख पटवली आहे. जॅक स्नाइप हा छोट्या आकाराचा पक्षी, पाणवनस्पतीमध्ये राहतो. आकाराने इतर स्नाइपपेक्षा तो लहान आहे. आखूड चोचेवरूनही या पक्ष्याची ओळख पटते. जॅक स्नाइपचे शास्त्रीय नाव ‘लिम्नोक्रिप्टस मिनिमस’ असे आहे. या पक्ष्याची नोंद ही अकोला जिल्हासाठी प्रथम नोंद ठरली आहे.

उर्वरित राज्यात नाही ग्रे प्लवरची नोंद
ग्रेप्लवर हा पक्षी राज्याच्या समुद्र किना-यावर स्थलांतर करून दरवर्षी येताे. मात्र, उर्वरित राज्यात त्याची नोंद झालेली नसल्याने अकोला परिसरातील हिवाळी पाणपक्षी अभ्यासादरम्यान पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार, किरण मोरे, निनाद अभंग यांनी या दोन पक्ष्यांची नोंद घेतली. नोंद ही विदर्भातील प्रथम अाहे,अशी माहिती वाइल्ड लाइफ अँड एन्व्हायर्नमेंट कंझर्व्हेशन सोसायटी (वेक्स)चे सचिव, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.