आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कुलसचिव’ पदासाठी विद्यापीठात गटबाजी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलसचिवपदाकरिता गटबाजी उफाळून आली आहे. आगामी पंधरा दिवसांमध्ये विद्यापीठाला नवीन कुलसचिव मिळणार असून, या पदासाठी लॉबिंगसोबत प्रतिस्पर्धी उमेदवारांची प्रकरणेदेखील उकरून काढली जात असल्याचे दिसून येत आहे.

नवीन कुलसचिव पदासाठी मे रोजी मुलाखत तर १० मे नंतर रूजू होणार असल्याची माहिती अाहे. या पदासाठी एकूण सहा अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये विद्यमान कुलसचिव दिनेश कुमार जोशी, बीसीयूडीचे संचालक डॉ. अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक डॉ. जयंत वडते, एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. संतोष सदार, गडचांदूर येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आसोले आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे उपकुलसचिव फुगारे यांचा समावेश आहे. कुलसचिव प्रा. दिनेशकुमार जोशी यांचा कार्यकाळ १० मे २०१५ रोजी संपुष्टात येत असल्याने विद्यापीठाकडून या पदाकरिता अर्ज मागवण्यात आले. विद्यापीठातील चार अधिकारी कुलसचिव पदाच्या शर्यतीत असल्याने चुरस वाढली आहे. कुलसचिव दिनेश कुमार जोशी यांचा कार्यकाळ स्वग्राम प्रवास भत्ता प्रकरणामुळे चांगलाच गाजला. स्वग्राम प्रकरणामुळे जोशी चांगलेच अडचणीत देखील आहे होते. मात्र, विद्यापीठाकडून गठित समितीकडून त्यांना क्लीन चिट मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला. बीसीयूडी संचालक डॉ. अजय देशमुख यांनी चुकीच्या मार्गाने पद मिळवल्याची चर्चा विद्यापीठात आहे. लीन आणि कागदपत्रांना घेऊन डॉ. देशमुख अडचणीत सापडले आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत डॉ. देशमुख यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणीचा प्रस्ताव देखील दाखल करण्यात आला होता. यापूर्वी देखील त्यांच्या नियुक्तीला घेऊन विद्यापीठाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या सिनेटमध्ये त्यांच्यावर दीर्घसूत्री दाखल करण्यात आली होती. समितीच्या शिफारशीनूसार त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता; मात्र कुलगुरू डॉ. मोहन खेडकर आणि त्यांच्या बाजूने सभागृहात असलेल्या बहुमताने त्यावर पडदा पडला.

सभागृहाने नामीत केलेल्या समितीचा चौकशी अहवाल सिनेटनेच फेटाळण्याची ऐतिहासिक घटना देखील विद्यापीठात प्रथमच घडली. सी.डी. देशमुख यांच्यासह बारा वरिष्ठ सदस्यांवर सभागृहातून बर्हिगमन करण्याची वेळ आली. डॉ. जयंत वडते यांच्या परीक्षा विभाग गुणवाढ प्रकरणाने चांगलाच गाजत आहे. राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशीनूसार परीक्षा विभागात सुधारणा करण्यात परीक्षा नियंत्रकांनी अपेक्षीत रस दाखविला नाही. सातत्याने गुणवाढ होत असताना देखील महत्वपूर्ण सुधारणा अद्याप करण्यात आल्या नाही. सतत कोणत्या-ना-कोणत्या वादाने चर्चेत राहणारे अधिकारी पुन्हा या पदाच्या शर्यशीत असल्याने चुरस वाढली आहे.

अशी आहे निवड समिती
मेरोजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्या अध्यक्षतेत निवड समिती कुलसचिव पदासाठी असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. निवड समितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. संतोष ठाकरे, सोमेश्वर पुसतकर, डॉ. गजानन बमनोटे यांच्यासह दोन बाहेरच्या तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. हे दोन तज्ज्ञ बाहेरील विद्यापीठांतून येणार आहेत.