आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil, Latest News In Divya Marathi

शेतकर्‍यांची फसवणूक थांबवण्यासाठी 57 भरारी पथके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बियाणे, खते व शेतीपयोगी इतर वस्तूंची खरेदी करताना शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, यासाठी जिल्ह्यात 57 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती शुक्रवारी (दि. 23) येथे दिली.
सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे. बियाणे आणून देण्याच्या नावाखाली काही दलाल शेतकर्‍यांना फसवू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश गरजेचा झाला आहे. त्यासाठी कृषी विभागाने व्यापक आखणी केली असून, जिल्हाभरात 57 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके बियाणे-खते-कीटकनाशके विक्रीस असलेल्या बाजारपेठांमध्ये कार्यरत असतील. त्यांची माहिती शेतकर्‍यांना देण्यात आली आहे. एखाद्या शेतकर्‍याची फसवणूक झाल्यास संबंधितांवर त्वरेने कारवाई केली जाईल. शासन पूर्णत: शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. कोणत्याही स्थितीत त्यांची फसवणूक होणार नाही, याकडे यंत्रणेचे लक्ष वेधण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांसह आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष संजय अकर्ते, जिल्हा परिषद सदस्य गिरीश कराळे, ‘आत्मा’चे संचालक एम. व्ही. देशमुख, कृषी विभागाचे सहसंचालक अशोक लोखंडे, माहिती उपसंचालक राठोड, जिल्हा माहिती अधिकारी शैला दांदळे उपस्थित होत्या.