आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Speak To Municipal Corporation Officers At Akola

महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडाडली पालकमंत्र्यांची तोफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराची साफसफाई, पार्किंगची अनागोंदी, सौंदर्यीकरणाबाबतची अनास्था, नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि विविध कामांसाठी महापालिकेत येणाऱ्यांना खाव्या लागणाऱ्या खस्ता आदी विषयांना स्पर्श करीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘मी या महापालिकेत खूप चकरा खाल्ल्या आहेत. कोण किती उजागर हे मी जाणतो. मला उगाच गरम करू नका’अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांच्या तोंडून बाहेर पडली.

आपल्या नियोजित कामकाजाचा भाग म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी महापालिकेचा आढावा घेतला. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी मुद्देनिहाय विचारणा केली. अनेक प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांकडे समर्पक उत्तरे नसल्याने ते संतप्त झाले होते. नगरसेवक हे ज्यांच्या बळावर निवडून येतात, त्या मतदारांना ते बांधील असतात.

आयुक्तांवर निशाणा
महापालिकेतवाहने किती ? जिप्‍स, कार, ट्रक, जेसीबी, बॉबकॅट किती ? मनपा क्षेत्रातील मालमत्तांची संख्या, त्यांची वर्गवारी, निवासी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्सेसचे बांधकाम आदी मुद्द्यांवर उत्तरे मिळत नसल्याने पालकमंत्र्यांनी थेट आयुक्तांवरच निशाणा साधला. अधिकाऱ्यांची अशी स्थिती असल्यामुळे मला तर आता तुमच्यावरच संशय यायला लागला आहे, असे पालकमंत्र्यांचे म्हणणे होते. परंतु हे वाक्य पूर्ण होताच आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या शिस्‍तभंग कारवाईचा आढावाच मंत्रीमहोदयांच्या पुढ्यात ठेवला. यानंतर पालकमंत्र्यांची त्यांचेही म्हणणे एकूण घेतले. मात्र, त्याने त्यांचे फारसे समाधान झाले नसल्याचे दिसून आहेले.

* स्वागतकक्ष उघडा. तेथेसर्वांच्या तक्रारींची नोंद ठेवा. लोकांच्या अडचणी सोडविणे, हे अगत्याचे समजा. त्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण विभागही उघडा.
* महागड्या-मोक्याच्याजागी एफएसआयवाढवून वन बीएचके (३५०-६० चौरस फूट) स्कीम देता येईल का, ते बघा. झोपडपट्टीमुक्त शहर हे स्वप्न त्यातून पूर्ण होऊ शकते. हा नाविण्यपूर्ण उपक्रम ठरु शकतो.
* डीपीसीतून(जिल्‍हा नियोजन समिती) मीपालिका-महापालिकेला २५ कोटी रुपये दिले आहेत. त्याला िवरोधही झाला. पण तो झुगारुन मी हे केले. त्याचा विनियोग होईल, हे बघा.
* हॉकरझोनचा मुद्दा निकालीकाढा. अतिक्रमण तोडा. ज्यांच्याबद्दल सार्वत्रिक तक्रार नसेल, वाहतूक अडचणीत येत नसेल तर राहू द्या.
* हॉटेल्स,मंगल कार्यालये इतरइमारतींना पार्कींग का नाही. नियोमानुसार बांधकाम झालेल्यांना अभय देऊ नका. अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. त्यात लक्ष घाला. ज्यांनी चूक केली, त्यांना दंड द्या.
* उघड्यावरीलमांस विक्री बंदकरा. दुकाने कापडाने झाकायला सांगा. प्रत्येक भागात एक िवशिष्ट जागा िनश्चित करुन त्यािठकाणीच मांस विक्री करण्याची सक्ती करा.