आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकाबंदी दरम्यान साडेचार लाखांचा गुटखा जप्त, करवार येथे शेंदुरजना घाट पोलिसांची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - शेंदुरजनाघाट पोलिसांनी करवार येथे नाकाबंदरदरम्यान एका व्हॅनमधून साडेचार लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक केली आहे. राजकुमार गोयंका गाडीचालक नरेंद्र गंधारे (दोघेही रा. अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असणाऱ्या करवार येथे नाकाबंदीदरम्यान बुलोरो पिकअपची (एमएच ३०/एबी ३५४८) झडती घेण्यात आली. त्यात सुगंधित तंबाखू, गुटका, पान मसाला असा चार लाख ६० हजार रुपये किमतीचा माल आढळून आला. पोलिसांनी व्हॅनसह नऊ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सिरसाठ, अशोक वानखडे, अनिल माहुरे, नितीन गेडाम, अमोल नवरे, विनोद पाटील यांनी पूर्ण केली.