आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामशाळांनी ‘टेकवली पाठ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातीलतरुण हा सुदृढ आरोग्यवान बनावा, या उद्देशाने शासनाने ‘गाव तेथे व्यायामशाळा’ योजना सुरू केली. मात्र, ग्रामपंचायतींच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील ८४२ पैकी फक्त २०५ ग्रामपंचायतींनीच प्रस्ताव सादर केले. त्यामुळे व्यायामशाळांच्या उभारणीत ग्रामपंचायतींनी माघार घेऊन पाठ टेकवल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना अपयशी ठरली आहे.

अमरावती जिल्ह्यातील १४ तहसील अंतर्गत एकूण ८४२ ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी केवळ २०५ अर्थात १७.२६ टक्केच ग्रामपंचायतींनी २०११ ते २०१५ पर्यंत व्यायामशाळांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यांपैकी १५८ ग्रामपंचायतींना व्यायामशाळा साहित्याचे वाटपसुद्धा करण्यात आले. उर्वरित ४७ प्रस्ताव अजूनही शिल्लक आहेत.

शासनाकडून व्यायामशाळेची इमारत साहित्यासाठी अनुदान दिलेजाते. त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतींना डीएसओ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र, ग्रामपंचायतींच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील ८२.८४ टक्के गावे व्यायामशाळांपासून वंचित असल्याचे वास्तव पुढे आले आहे. गटविकास अधिकाऱ्यांसमक्ष प्रत्येक तालुक्यांमध्ये बैठकी घेऊन योजनेसंदर्भात तालुका क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांना वारंवार माहिती देण्यात आली,

व्हिजन २०-२० राबवणार
-.जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या व्हिजन २०-२० उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये व्यायमशाळा उभारल्या जातील. योजनेला १०० टक्के यशस्वी करण्यासाठी तालुका पंचायत समितीस्तरावर बैठकी घेऊन जास्तीत जास्त प्रस्ताव यावेत, यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामसेवकांना आवश्यक ती माहिती दिली जाईल. अविनाशपुंड, जिल्हाक्रीडा अधिकारी, अमरावती.