आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"अपंगांना घरकुल योजनेत विनाअट समाविष्ट करा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातीलअपंग निराधारांच्या विविध जिवनावश्यक मागण्यांसंदर्भात अपंग जनता दलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. २४) निवेदन देण्यात आले. अंध, अपंग, विधवा, घटस्पोटीत, शेतमजूर निराधार यांच्या विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.
घरकुल योजनेत विनाअट समाविष्ट करण्यात यावे, पंचायत समिती, जिल्हा परिषद ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण पुनर्वसनासाठी राखीव असलेला टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा, अन्न सुरक्षा अंत्याेदय योजनेत विनाअट समाविष्ट करण्यात यावे.

अपंग कर्मचाऱ्यांना समायोजन बदली प्रक्रीयेतून वगळण्यात यावे. आदी मागण्या निवेदनात आहेत. शेख अनिस, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष ज्योती देवकर, महासचिव राजीक शाहा, अवधुत जबडे यांच्यासह अनेकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
बातम्या आणखी आहेत...