आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सांभाळण्यासाठी ‘आयएमए’ने घेतला निर्णय, क्लिनिकपर्यंत ‘सायकलिंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुदृढआरोग्य प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील डॉक्टर्सनी घरापासून क्लिनिकपर्यंत सायकलिंग करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे. यासाठी सायकल क्लबची स्थापना करण्यात आली आहे.
क्लबच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करणे तसेच इंधनापासून होत असलेल्या प्रदूषणावर सायकलिंगने मात करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. आयएमएचे दिलीप सारडा यांनी रविवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, राज्यात २२० शाखा असून ३५०० सदस्यसंख्या आहे. अमरावती विभागात ६५० सभासद असून, विविध उपक्रमांच्या माध्यमांतून जिल्ह्यात आरोग्यसेवा पुरवली जाते. डॉक्टर एक रोल मॉडेल असून, त्यांनी घरापासून तर क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा, जेणेकरून आरोग्य सुदृढ राहील त्या माध्यमातून इतरांनाही संदेश पोहोचेल, असे मत सारडा यांनी मांडले.
याशिवाय पत्रपरिषदेच्या माध्यमातून असोसिएशनने राबवलेले विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. पत्रपरिषदेला मुंबईचे जयेश लेले, मििलंद नाईक, टी. सी. राठोड, मंगेश गुलवाडे, वसंत लुंगे, अरविंद कुळकर्णी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

स्वास्थ्यमंत्र
आयएमएचा विरोध
होमिओपॉथीअभ्यासात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी त्याच क्षेत्रात सराव करावा, असे कायद्यात नमूद आहे. मात्र, कायदा पायदळी तुडवत अनेक होमिओपॉथीचे डॉक्टर ऑलोपॉथीचा सराव करतात. अशा क्रॉसपॅथीला आयएमएचा विरोध असल्याचे सदस्य म्हणाले.
मृत्यूनंतर करा देहदान : लेले
मृत्यूनंतरदेहदान करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. असे झाल्यास मृत्यूनंतर आपण दुसऱ्याला जीवदान देऊ शकतो. देहदान करण्यात राज्य पिछाडीवर आहे. अवयवाचे दान करून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी. यकृत, त्वचा, नेत्र हृदय आदी अवयवांचे दान करून इतरांना जीवदान देता येऊ शकते. नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लेले यांनी केले.