आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान: हुडहुडी चुकवतेय हृदयाचा ठोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- धुंद दाटलेले धुके, अंगाला बोचणारा गारवा हा भल्याभल्यांना घातक ठरतो आहे. मागील काही दिवसांपासून थंडीची हुडहुडी अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहे. हृदयरुग्णांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. परिणामी श्वासोच्छवास योग्य पद्धतीने होत नसल्याने हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढते, असे हृदयविकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा रुग्णांमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांचे मत आहे.
शहरात मोठय़ा प्रमाणावर हृदयरोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. तपमानात घसरण झाल्यापासून वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. थंडी आरोग्यासाठी पोषक असल्याचे म्हटले जाते. मात्र, दिवसेंदिवस तापमानात होणारे बदल, गतिमान झालेली जीवनशैली आणि आहार-विहाराकडे होणारे दुर्लक्ष या सार्‍यांच्या परिणामी मानवीय जिनोममध्ये वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होत आहे.
थंडीमध्ये शरीरात असलेल्या रक्त तसेच वायूचा पुरवठा करणार्‍या वाहिन्या आंकुचन पावतात. त्यामुळे पूर्वीच ब्लॉकेजेस असलेल्या काही वाहिन्यांमधून रक्तपुरवठा किंवा श्वासोच्छवास करण्यास संबंधित रुग्णाला अडचण येते. पर्यायाने त्याच्या हृदयावरील ताण वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बळावतो.
शहरातील र्शी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून हृदयविकाराच्या रुग्णांचे उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. थंडीमुळे हृदयरुग्णांच्या आकुंचन पावणार्‍या वाहिन्यांवर परिणाम होत असल्याने त्यांना त्रास होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले, अशा रुग्णांनी घाबरून न जाता वेळीच उपचार घ्यावेत, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
असा राखता येईल हृदयाचा ग्राफ

हृदयविकार म्हणजे काय?
अनेक जण हृदयविकाराबाबत केवळ ऐकून असतात. मात्र, हृदयविकार म्हणजे काय, हे नेमके त्यांना त्याच्याशी सामना केल्यानंतरच स्पष्ट होते. तेव्हा त्याविषयी काही बाबी -
0 हृदय शरीराच्या विविध भागांना शुद्ध रक्त पुरवण्याचे कार्य करत असते. हृदयाला प्राणवायू देणारा रक्तपुरवठा करणार्‍या शुद्ध रक्तवाहिन्यांना धमन्या (कोरोनरी आर्टरी) म्हणतात.
0 या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले, तर हृदयापर्यंत योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही आणि ते कमकुवत होण्यास प्रारंभ होतो. यालाच हृदयविकार म्हणून संबोधले जाते.
0संबंधित रुग्णाच्या हृदयातील स्नायूंना नेमकी किती दुखापत (डॅमेज) झाली आहे, याचे निदान केल्यावरच डॉक्टर संबंधित रुग्णाच्या हृदयविकाराची धोक्याची पातळी निश्चित करतात. स्नायू मृत झालेले असल्यास हृदयाला होणार्‍या रक्तपुरवठय़ाचा वेग मंदावतो. याला वैद्यकीय भाषेत ‘कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर’ संबोधले जाते. त्यामुळे घाम येऊन रुग्णाला श्वासोच्छवासास त्रास होतो.
महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक
व्यसन हेदेखील हृदयविकार बळावण्याचे कारण ठरत आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्याने हृदयविकार होण्याचा धोका त्यांच्यामध्ये 40:60 अशा प्रमाणात असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जाणीव होताच डॉक्टरांना दाखवा
हृदयविकारामध्ये घाम येणे, छातीत दुखणे, अचानक अस्वस्थ वाटणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. या संबंधीची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तातडीने हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. वेळीच उपचार झाल्यास हृदयरोग नियंत्रणात येऊ शकतो.