आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मुले म्हणतील, ‘बाबा, हेल्मेट वापरा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वाहनचालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी अनेकदा वाहनचालकांना सांगण्यात येते; तरीही अनेकजण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नुकताच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी शहरातील ज्ञानमाता हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले. या वेळी मुलांना सांगण्यात आले, की आपापल्या पालकांना हेल्मेट वापरायला, सीट बेल्ट लावायला सांगा. त्यामुळे आता ही मुलं घरी जाऊन आपल्या वडिलांना म्हणतील- बाबा, हेल्मेट वापरा.

शनिवारी आरटीओ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता कसा पार करावा? सिग्नल कशाला म्हणतात, सिग्नलमधील दिव्यांचे अर्थ काय? हे पटवून दिले.तसेच आई, वडिलांना हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करण्यास सांगा,असे आवाहन केले.आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेला संदेश मुलांच्या माध्यमातून का होईना, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच मुलांना आता दिलेले वाहतुकीचे धडे भविष्यात त्यांना नक्कीच उपयोगी पडणार आहे. या वेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक वनिय गांगुर्डे, श्याम बघेल तसेच ‘ज्ञानमाता’चे मुख्याध्यापक फादर आरोक्य सामी प्रामुख्याने हजर होते.

विद्यार्थ्यांना माहिती देणे आवश्यक
-बालवयातमुलांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी,यासाठी आम्ही त्यांना हेल्मेट, सीट बेल्ट वापरण्याचे महत्व पटवून दिले. त्यामुळे ते आता त्यांच्या पालकांनाही वापरण्यासाठी आग्रह करतील. वनियगांगुर्डे, सहायक मोटर वाहन निरीक्षक, आरटीओ कार्यालय, अमरावती.