आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Pressure Electricity Tower Damage Farm Land

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्चदाब वीज टॉवरमुळे शेतजमिनीचा बट्ट्याबोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - उच्चदाबवाहिन्यांच्या कामामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच शेतक-यांना नुकसानभरपाईसुद्धा तोकडी देण्यात येत असल्याने शेतक-यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतक-यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना सरसावली आहे. या अन्यायाच्या विरोधात सर्व शेतक-यांनी आता एकत्रित लढा उभारावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांनी दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी विद्युत लाइनचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. औरंगाबाद ते नागपूर ७६५ के.व्ही. लाइन उभारण्याचे काम महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लि. नागपूर यांच्यामार्फत सुरू आहे. तसेच नागपूर ते अकोल्यापर्यंत ५०० के.व्ही.ची लाइन ओढण्याचे काम पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनतर्फे सुरू आहे. याव्यतिरिक्त ११ कंपन्या अशाच प्रकारे टॉवर उभारण्याचे काम करत आहेत. शेतामध्ये टॉवर उभे करण्याच्या कामामुळे शेतक-यांचे मात्र प्रचंड नुकसान होत आहे. टॉवरचे काम त्यामुळे होणारे नुकसान याचा अंदाज घेतल्यास शेतक-यांच्या मागणीनुसार, त्यांना प्रतिटॉवर १० लाख रुपये देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र या कंपन्या प्रत्येक शेतक-याला वेगवेगळी रक्कम एकाच कामाची देत असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय काकडे पाटील यांनी वारंवार सरकारकडे दिले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद पाटील तसेच महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नागरे यांनी या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकारात्मक विचार सुरू
ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी आता आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या संदर्भातील अहवाल मागितले आहे. शेतक-यांना नुकसानभरपाई कशी देता येईल यावर विचार सुरू करण्यात आला आहे. मात्र, आम्ही पाठपुरावा करणे सोडणार नाही. मिलिंदपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी

शेतजमिनीची नासाडी
टॉवरचेकाम करत असताना पिकांचे मोठे नुकसान होते. जड तारा ओढल्या जात असल्याने पीक खराब होते तसेच जड वाहनांच्या येण्या-जाण्यामुळे शेतजमिनीचा सत्यानाश होत आहे. यामुळे शेतक-यांचे वर्षभराचे पीक वाया जाते. एवढेच नव्हे तर या ठिकाणी लागणा-या उच्च दाबांच्या वीजवाहक तारांमुळे त्याखाली योग्य पीक येत नाही. तारांखाली ट्रॅक्टरसुद्धा फिरवता येत नाही. जमीन ओली असल्यास जवळपास ६० फुटांपर्यंत शॉक लागत असल्याचे मिलिंद पाटील यांनी सांगितले.

शेतक-यांना वेगवेगळे धनादेश
संघटनेतर्फेशेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यात येत आहे. सारख्या जागेचे वेगवेगळ्या दिलेल्या रकमेचे धनादेश जमा करण्यात येत आहे. या आधारावर ठोस पुरावे सादर करून सरकारकडे दाद मागण्यात येत आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष
शेतक-यांसोबतयोग्य स्पष्ट करारनामा झाल्याशिवाय कंपनीने काम करू नये, अशी मागणी बळीराजा संघटनेने केलेली आहे. राज्यातील अनेक जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहे. ज्या शेतक-यांच्या शेतामध्ये टॉवरचे काम होणार असेल .त्या शेतक-याळी कंपनीने करारनामा करावा होणा-या नुकसानीचा पंचनामा करावा आणि टॉवर उभारण्यापूर्वी देय रक्कमेचा धनादेश द्यावा, अशीही मागणी संघटनेमार्फत करण्यात आली आहे.

लाक्षणिक उपोषण
अनेकदानिवेदन देऊन शेतक-यांच्या या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत यवतमाळात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे इतरही जिल्ह्यात उपोषण करण्यात येणार आहे.