आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकर्सना मूलभूत सुविधाच नाहीत; कर कशासाठी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-महापालिका मूलभूत सुविधा पुरवत नसताना फेरीवाल्यांकडून व्यावसायिक कर मात्र वसूल करते. आता नव्याने निश्चित होत असलेल्या हॉकर्स झोनजवळ पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध कराव्यात, असा मुद्दा महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनने लावून धरला.
महापालिका क्षेत्रात आयुक्त बदलले, की हॉकर्स झोन बदलतात. यावर अद्यापही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. महापालिका पदाधिकारी-अधिकार्‍यांची अनास्था यासाठी कारणीभूत आहे. पोलिसांच्या कारवाईचा फटकादेखील फेरीवाल्यांनाच बसतो. वाहतूक पोलिसांची कारवाई होत नाही तोच मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून बडगा उगारला जातो. हॉकर्स झोन निश्चित नसल्याने शहरात फेरीवाल्यांचे हे हाल होत आहेत, असे मुद्दे महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनने बैठकीत मांडले. सध्याच्या हॉकर्स झोनमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने फेरीवाले तेथे गाड्या लावण्यास तयार नाहीत.
त्यामुळे नाइलजास्तव अनेकांना रस्त्याच्या कडेला गाड्या लावाव्या लागत आहे, असेही मत संघटनेने मांडले. राष्ट्रीय हॉकर्स धोरण निश्चित झाल्यानंतर महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. हॉकर्स संघटनांसोबत प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत टाउन वेंडिंग कमिटी गठित करण्यावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले. 40 सदस्यीय समितीमध्ये पाच संघटनांचे पदाधिकारी तसेच महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे.