आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हिरावू नका, हॉकर्सचे महापालिकेत आंदोलन; अतिक्रमण कारवाईचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अतिक्रमण कारवाईच्या नावाने रोजगार हिरावू नका, अशी आर्त हाक शहरातील फेरीवाल्यांनी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांना घातली आहे. अतिक्रमण कारवाईविरोधात महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशनच्या (आयटक) नेतृत्वात फेरीवाल्यांनी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) महापालिकेत आंदोलन केले. सर्वेक्षण करीत परवाना ओळखपत्र देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
शहराच्या विविध भागांत काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. शहरात हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार नसल्याचे महापालिका पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेकडून गठित करण्यात आलेल्या संयुक्त समिती सदस्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्याबाबतदेखील विविध बैठकांमध्ये निश्चित करण्यात आले.
स्वत: आयुक्त डोंगरेदेखील या निर्णयावर समाधानी होते. हॉकर्सचा रोजगार हिरावून घेतला जाऊ नये म्हणून पाहणी करीत परवाना ओळखपत्रदेखील दिले जाणार होते. मात्र, अद्यापही महापालिकेकडून पाहणी करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. परवाना किंवा ओळखपत्र तर दिले नाहीच, शिवाय कारवाईचा बडगा उगारत हॉकर्सचे साहित्यदेखील जप्त करण्याचा प्रकार झाला आहे. हॉकर्सला रोजगारापासून वंिचत करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे दिशा-निर्देश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची महापालिकेकडून अवहेलना होत असल्याचेदेखील हॉकर्स संघटनेचे म्हणणे आहे. या वेळी उपायुक्त रमेश मवासी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या वतीने जिल्हािधकारी किरण गित्ते यांनादेखील निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हा सचिव सुनील घटाळे, जिल्हाध्यक्ष जे. एम. कोठारी, कमलाकर पिढेकर, बिसमिल्लाह, मो. मुकीम मो. याकूब, दीपक सूर्यवंशी, मेहमूद, राजेंद्र सोनटक्के, सुधाकर ठाकरे, नारायण तायडे, नंदगोपाल शर्मा, रूपराव बनसोड, अरुण शेरेकर, शीतलकुमार साहू, मोहसीन खान मुर्तजा खान, दीपक हिमाने, कुंदन नेमाणी, विलास वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने हॉकर्स उपस्थित होते.