आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहन कॉलनीमध्ये दोन लाखांची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कॅम्प परिसरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या मोहन कॉलनीमध्ये 84 वर्षीय सेवानिवृत्त महिला उपशिक्षणाधिकार्‍याच्या घरातून चोरट्यांनी गुरुवारी दोन लाखांची रोकड लंपास केली.

कुसुमबाई अनासने या सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी आहेत. अनासने यांचे ‘कुसुमांजली’ घर मोहन कॉलनीत आहे. त्या एकट्याच या घरात राहतात. नऊ नोव्हेंबरपासून त्या शहरातील लक्ष्मीनारायण कॉलनीत राहणार्‍या त्यांच्या एका नातेवाइकाकडे गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद होते. 11 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास त्या घरी परतल्या, त्यावेळी चोरी झालेली नव्हती. मात्र, गुरुवारी सकाळी त्या पुन्हा घरी परतल्यावर घराचा मुख्य दरवाजा त्यांना उघडा दिसला. या दरवाजाला असलेले कुलूप चोरट्यांनी तोडले होते. घरातील कपाटात अनासने यांनी दोन लाखांची रोकड ठेवली होती. चोरट्यांनी हीच रक्कम लंपास केली. तत्काळ ही माहिती शहर कोतवाली पोलिसांना देण्यात आली. चोरट्यांनी दोन लाखांच्या रकमेसह दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे भांडेही लांबवले. मोहन कॉलनीसारख्या दाट वस्ती असलेल्या भागात चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कांचन पांडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवि राठोड, उपनिरीक्षक नितीन थोरात यांनी आपापल्या पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.