आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपुलकीच्या ‘शुश्रूषे'ला रिक्त मनुष्यबळाचा ताण,एक परिचारिका देते २० रुग्णांना सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातील नागरिकांच्या बिघडलेल्या रुग्णांच्या ‘तब्येती’ला आपुलकीने प्रेमाने सांभाळणाऱ्या परिचारिका सध्या तणावात आल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढलेल्या कामाच्या बोजामुळे या परिचारिकांना धड एकाही रुग्णाची शुश्रुषा करता येत नसल्याचे चित्र जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालयात दिसून येत आहे. योग्य सेवा मिळत नसल्याच्या सततच्या तक्रारी वरिष्ठांच्या कारवाईच्या भीतीने या ताणात भर पडत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय ही जिल्ह्याची मुख्य दोन रुग्णालये आहेत. परंतु रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता, या रुग्णालयांतील सेवा मनुष्यबळाचा प्रश्नही लक्षात घ्यायला हवा. मात्र, परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे त्यांच्यावरील कामाचा बोजाही वाढला आहे. शासनाच्या दिशानिर्देशांनुसार रुग्णांच्या मागे परिचारिकांची जी संख्या असायला हवी; ती तर नाहीच. पण सध्या जे मंजूर पदे आहेत, त्यांपैकीही बहुतांश पदे रिक्त असल्याने परिचारिकांवरील ताण अधिकच वाढला आहे.

दरम्यान, रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढल्याने रुग्णांना हवी तशी सेवा देता येत नसल्याची खंत परिचारिकांनी व्यक्त केली. आधीच परिचारिकांची कमतरता त्यातही काही परिचारिका किरकोळ कामानिमित्त रजेवर असल्यास रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे सांगितले. रुग्णांची सेवेसह विविध कामांकडेही त्यांना लक्ष द्यावे लागत असल्याने मानसिक त्रास चिडचिड होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, अशा परिस्थितही परिचारिकांना योग्य पद्धतीने आपली कर्तव्य पार पाडावी लागत आहेत. रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार सांभाळताना अनावधानाने एखादी चूक घडल्यास कारवाईचा बडगा कायम डोक्यावर टांगलेला असतो.

परिचारिकांच्या सेवेबाबत उदासीनता
-परिचारिकांवरताण आहे, ही गोष्ट खरी आहे. रुग्णालयात ६० परिचारिका कार्यरत आहेत. सप्टेंबरमध्ये िरक्त पद भरतीसाठी २५ जागांसाठी मुलाखती घेतल्या.त्यांपैकी चार परिचारिका रुजू झाल्या. त्यातही दोघी सोडून गेल्या.परिचारिकांच्या सेवेबाबत उदासीनता आहे. डॉ.अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय ,अमरावती.
निर्देशिका
दररोज भरती होणारे पेशंट , पुढील स्‍लाइडवर...