आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयात धुमाकूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागीलपंधरा दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोमवारी (दि. 3) सकाळी सुटी दिलेल्या महिलेची सायंकाळी प्रकृती बिघडल्याने तिला त्याच रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यामुळे मृतकाच्या संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना खापर्डे बगिच्या परिसरातील पारश्री रुग्णालयात रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
हनीफा बी मोहम्मद हनीफ (60, रा. जमील कॉलनी, अमरावती) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करीत मृत महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात हत्यारबंद धुमाकूळ घातल्याने परिसरात तब्बल दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांना पाचारण केल्यानंतर परिस्थती आटोक्यात आली. सविस्तर वृत्त असे, की खापर्डे बगिचा परिसरातील डॉ. श्रीगोपाल राठी यांच्या पारश्री रुग्णालयात हनीफा बी यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगून रुग्णालय प्रशासनाकडून हनीफा बी यांना सोमवारी (िद. ३) सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाइकांनी ७० हजार रुपयांचे बिल चुकता केले होते. घरी गेल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने सायंकाळी हनीफा बी यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. थोड्या वेळानंतर उपचार करणारे रुग्णालयातील डॉ. मोईन खान यांनी हनीफा बी यांना मृत घोषित केले. मृत्यूची बातमी कळताच संतप्त नातेवाइकांनी पारश्री रुग्णालयाच्या खिडक्या, दरवाजासह डॉ. नितीन राठी यांच्या कक्षाची हॉस्पिटल परिसराची तोडफोड केली. डॉक्टरवर कारवाई करावी, या मागणीसाठी तब्बल दीड तास संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात धुमाकूळ घातला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काही वेळातच फ्रेजरपुरा आयुक्तालयातील पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचताच नागरिकांना रुग्णालयाबाहेर काढण्यात आले.
तीनआमदार पोहोचले घटनास्थळी
संतप्तनातेवाइकांचा राग अनावर झाल्याने रुग्णालयाची तोडफोड केल्याची बातमी कळताच भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर विधानपरिषदेचे आमदार प्रवीण पोटे इतर लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन मृतकाच्या नातेवाइकांचे सांत्वन केले.