आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होस्टेलमधील मुलींचा आता पोलिसांशी होणार थेट संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलएका संस्थेच्या वसतिगृहात १४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

शिक्षण घेण्यासाठी शहरातील अनेक वसतिगृहांत हजारो मुली राहतात. यावेळी अनेकदा मुलींना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. अडचण आल्यानंतर प्रत्येक वेळी मुलींना संबधित पोलिस ठाण्यात जाऊन आपली समस्या मांडणे शक्य होत नाही. अशा वेळी त्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडे अधिक मोकळेपणाने बोलू शकतात, ही बाब हेरून शहर पोलिसांनी महिला वसतिगृहांमध्ये एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह महिला कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक लिहिलेले फलक लावणे सुरू केले आहे.

या फलकांमुळे वसतिगृहातील मुलींना अडचणीच्यावेळी संबधित महिला अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे. उपनिरीक्षक माधुरी उंबरकर यांच्यासह कमल लाडवीकर, उज्वला झाडे यांचे मोबाईल क्रमांक सोबतच महिला हेल्पलाईनचा क्रमांकही या फलकावर अंकीत करण्यात आला आहे.

तपासातउघडकीस आली धक्कादायक माहिती
शहरातीलएका संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले असून, या प्रकरणाचा तपास उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी स्वत: सुरू केला आहे. तपास पुढे सरकत असताना इतरही काही धक्कादायक माहिती पोलिसांपुढे येत आहे. मुलींना अत्याचारािवरुद्ध तक्रार करणे सोपे जावे, यासाठी शहर पोलिसांनी हा निर्णय घेतला असून, या िनर्णयाचे अनेक सामािजक संघटनांनी स्वागत केले आहे.
वसतिगृहातील मुलींना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा, यासाठी महिला पीएसआयसह महिला कर्मचाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाचे फलक वसतिगृहात लावण्यात आले आहे.

समस्या मांडता येईल
-वसतिगृहातराहणाऱ्या मुली या घरापासून लांब असतात. त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सहजपणे पोलिसांपर्यंत पोहचाव्यात, यातही या अडचणी ऐकून घेण्यासाठी महिला अधिकारी किंवा कर्मचारी असल्यास अधिक फायदा होईल. त्यामुळेच शहरातील चार वसतिगृहात सध्या असे फलक लावण्यात आले असून, उर्वरीत वसतिगृहांमध्ये फलक लावण्याचे काम सुरू आहे. रियाजोद्दीनदेशमुख, पीआय,गुन्हे शाखा.

अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण
शिक्षणासाठी घरापासून दूर वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना अडचणींच्या वेळी पोलिसांशी थेट संपर्क साधता यावा, यासाठी पोलिस आयुक्तांनी शहरातील मुलींच्या प्रत्येक वसतिगृहात महिला पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक असलेले फलक लावणे सुरू केले आहे. या उपक्रमामुळे आता अडचणीत असलेल्या मुलींना थेट महिला पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे.
रात्रीच्या वेळी होत असे रुग्णवाहिकेचा वापर
वसतिगृहातराहणाऱ्या मुलींना घरच्या कामासाठी बोलवण्यात येत होते. तसेच रात्रीच्यावेळी मुलींना रुग्णवाहिकेमध्ये बसवून बाहेर आणले जात होते. हा प्रकार अनेकदाचा घडला असून, प्रत्येक वेळी मुलींना रुग्णालयात नेले जात होते, असेही नाही, अशी धक्कादायक माहिती चौकशीदरम्यान पुढे आहे. पोलिसांनी आतापर्यंत अतिशय उत्तम योग्य असा तपास केला आहे, असेही डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले. तसेच याच प्रकरणासाठी जानेवारीला परत शहरात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.