आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hostel Problems Issue At Amravati, News In Marathi

वसतिगृहात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, इमारतीचे स्थानांतरणाची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गाडगेनगरातील आदिवासी वसतिगृगहाची इमारत मोडकळीस आल्याने वसतिगृहाचे तत्काळ स्थानांतरण करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी युवा सेनेच्या नेतृत्वात आदिवासी विकास विभागावर धडक दिली. संतप्त विद्यार्थ्यांनी निदश्रने करत आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त वाळिंबे यांच्या दालनाची पाटीसुद्धा तोडली.

शासनातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विभागातील निवास व भोजनव्यवस्था अत्यंत निकृष्ट आहे. गाडगेनगरातील वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत वारंवार तक्रारही केली. मात्र, दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या नशिबी गुरांप्रमाणे जगणे आले. विद्यार्थ्यांसाठीच्या निधीवर अधिकारी डल्ला मारत असल्याचा आरोप युवा सेनेच्या पराग गुडधे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी केला आहे. वसतिगृह इमारतीत पाणी साचले असून ती कधीही पडू शकते. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ नये, म्हणून प्रशासनाने लक्ष घालून तीन दिवसांत विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून युवा सेनेचे प्रवक्ता गोपाल राणे, अमोल पाटील, विशाल देशमुख, शैलेश सोळंके, विशाल सावळे, नीलेश सावरिया, राजू धुर्वे, रामलाल उईके, कमल मावरकर यांच्यासह एकूण 48 विद्यार्थ्यांंची निवेदनावर स्वाक्षरी आहे.